पदवीधर विद्यार्थ्यांची नावे संकेतस्थळावरून गायब
By Admin | Updated: May 11, 2014 00:33 IST2014-05-11T00:33:08+5:302014-05-11T00:33:08+5:30
उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाच्या २२ व्या दीक्षांत समारंभाची तारीख २१ रोजी जाहीर झाली असली तरी अनेक पदवीधर विद्यार्थ्यांची नावे संकेतस्थळावरून गायब झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

पदवीधर विद्यार्थ्यांची नावे संकेतस्थळावरून गायब
जळगाव : उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाच्या २२ व्या दीक्षांत समारंभाची तारीख २१ रोजी जाहीर झाली असली तरी अनेक पदवीधर विद्यार्थ्यांची नावे संकेतस्थळावरून गायब झाल्याचा प्रकार समोर आला आहे. विद्यापीठाच्या अधिकृत संकेस्थळावर ज्या १४ हजार ८९१ विद्यार्थ्यांना पदवी देण्यात येणार असल्याची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यात अनेक पदवीधर विद्यार्थ्यांची नावे नसल्याची तक्रार आहे. नावे गायब झाल्यामुळे पदवी मिळणार का नाही? असा संभ्रम असलेल्या विद्यार्थ्यांनी शनिवारी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास थेट विद्यापीठात आपला मोर्चा वळविला. पदवीसाठी विद्यार्थ्यांनी आॅनलाईन अर्ज व त्यानंतर ३५० रुपयांचे चलन भरले होते. त्या चलनाची पावती विद्यार्थ्यांकडे असतानाही त्यांची नावे गायब झालीच कशी? असा प्रश्न विद्यार्थ्यांनी येथे उपस्थित केला. विद्यापीठाची चूक झाल्यानंतर तांत्रिक अडचणीचे कारण पुढे केले जात असल्याचा प्रकार विद्यार्थ्यांसाठी जरी नवीन नसला तरी हा प्रकार मात्र नवीन आहे.