‘खान्देशातील विद्यापीठाला बहिणाबार्इंचे नाव द्या’

By Admin | Updated: February 23, 2015 02:42 IST2015-02-23T02:42:33+5:302015-02-23T02:42:33+5:30

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवयित्री व खान्देश कन्या बहिणाबाई चौधरी यांचे नाव द्यावे, अशी मागणी खान्देश बहिणाबाई-सोपानदेव साहित्य संमेलनात एकमुखाने करण्यात आली.

Name 'Khandesh University's University with Outsiders' | ‘खान्देशातील विद्यापीठाला बहिणाबार्इंचे नाव द्या’

‘खान्देशातील विद्यापीठाला बहिणाबार्इंचे नाव द्या’

जळगाव : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवयित्री व खान्देश कन्या बहिणाबाई चौधरी यांचे नाव द्यावे, अशी मागणी खान्देश बहिणाबाई-सोपानदेव साहित्य संमेलनात एकमुखाने करण्यात आली.
येथील आसोदा-भादली मार्गावरील नियोजित बहिणाबाई चौधरी स्मारकस्थळी पंधरावे संमेलन झाले. साहित्यिक शशिकांत हिंगोणेकर यांनी संमेलनाचे उद्घाटन केले. अरविंद नारखेडे अध्यक्षस्थानी होते. लेवा गणबोलीच्या जतन व संवर्धनासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे. आकाशवाणीवर या बोलीतून कार्यक्रम सादर व्हावे. खान्देशातील शिक्षणसंस्थांनी स्थानिक बोलीतून सांस्कृतिक कार्यक्रम घ्यावेत, आदी ठराव करण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Name 'Khandesh University's University with Outsiders'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.