शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
2
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
3
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
4
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
5
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
6
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
7
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
8
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
9
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
10
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
11
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
12
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
13
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
14
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
15
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
16
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
17
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
18
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
19
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
20
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...

‘फिजिओथेरेपी’साठी अभ्यासक्रम नसलेल्या महाविद्यालयाचे नाव

By admin | Updated: July 2, 2014 00:51 IST

वैद्यकीय आणि आरोग्यशास्त्रातील फिजिओथेरेपी अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा (सीईटी) ऊत्तीर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना भंडारा जिल्ह्यातील ज्या महाविद्यालयाचे नाव देण्यात आले आहे,

भंडारा : वैद्यकीय आणि आरोग्यशास्त्रातील फिजिओथेरेपी अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा (सीईटी) ऊत्तीर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना भंडारा जिल्ह्यातील ज्या महाविद्यालयाचे नाव देण्यात आले आहे, त्या महाविद्यालयात हा अभ्यासक्रम नाही. राज्याच्या तंत्रशिक्षण संचलनालयाने (डायरेक्टरेट आॅफ टेक्निकल एज्युकेशन) या महाविद्यालयाचे नाव संकेतस्थळावर जाहीर करुन विद्यार्थ्यांना यादीही पाठवून आपल्या भोंगळ कारभाराचा परिचय दिला आहे.तंत्रशिक्षण संचालनालयाने भिलेवाडा येथील फिजिओथेरेपी महाविद्यालय अलॉट केल्यामुळे विद्यार्थी आणि पालक दिलेला पत्ता शोधत भिलेवाडा येथे पोहोचत आहेत. परंतु ज्या महाविद्यालयाचे नाव संकेतस्थळावर देण्यात आले आहे, त्या महाविद्यालयात हा अभ्यासक्रमच नसल्याचे उघडकीस आले आहे. महाविद्यालयात फिजिओथेरेपी किंवा समकक्ष कोणताही अभ्यासक्रम नसल्याचे विद्यार्थ्यांना सांगण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना निराश होऊन परतावे लागत आहे. यादीत भिलेवाडाचे नाव असोसिएशन आॅफ मॅनेजमेंट आॅफ अनएडेड मेडिकल अ‍ॅण्ड डेन्टल महाविद्यालयाने सत्र २०१४-१५ साठी मेडिकल, डेन्टल आणि अन्य आरोग्यशास्त्र अभ्यासक्रमाच्या पहिल्या टप्प्यातील प्रवेशासाठी पात्र महाविद्यालयांची यादी जाहीर केली. अनेक विद्यार्थ्यांची नावे भिलेवाडा येथील सन्मार्ग शिक्षण संस्थेद्वारा संचालित कॉलेज आॅफ फिजिओथेरेपी येथे देण्यात आली आहेत. मात्र प्रत्यक्षात भंडारा जिल्ह्यात वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी एकही महाविद्यालय अस्तित्वात नाही. भंडाऱ्यापासून सहा किलोमीटर अंतरावर सन्मार्ग शिक्षण संस्थेचे भिलेवाडा येथे अभियांत्रिकी, डिप्लोमा अभ्यासक्रमाचे महाविद्यालय आहे. परंतु तिथे फिजिओथेरेपी किंवा आरोग्यशास्त्र अभ्यासक्रम नाही. महाविद्यालयाची डोकेदुखी वाढलीयासंदर्भात भिलेवाडा स्थित अभियांत्रिकी महाविद्यालयात संपर्क साधला असता ते म्हणाले, तंत्रशिक्षण संचालनालयाने संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या नावापुढे महाविद्यालयाचे नाव जाहीर केले आहे. विद्यार्थी प्रवेशासाठी मोठ्या संख्येने येत आहेत. नागपूर व मुंबई येथील तंत्रशिक्षण संचलनालय कार्यालयाशी संपर्क साधला असता दूरध्वनी वाजतो, पण कुणीच उचलत नाही. (जिल्हा प्रतिनिधी)