शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

३ जिल्ह्यांत नाकाबंदी, ५ तास इंटरनेट बंद; मराठवाड्यात मराठा आंदोलनाचे पडसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2024 06:26 IST

बीड जिल्ह्यात यापूर्वी झालेल्या आंदोलनाच्या वेळी जाळपोळीच्या गंभीर घटना घडल्या होत्या.

लोकमत न्यूज नेटवर्क जालना/छत्रपती संभाजीनगर/ बीड : मराठा आरक्षण आंदोलन तीव्र होत असल्याने सोमवारी छत्रपती संभाजीनगर, बीड आणि जालना जिल्ह्यात पोलिसांनी नाकाबंदीसह इंटरनेट सेवा ५ तास बंद केली. पोलिसांनी कठोर भूमिका घेत बीड- जालना जिल्ह्याची सीमा बंद केली. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात तीर्थपुरी येथे अज्ञातांनी एसटी बस पेटविली. अंबड तालुक्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

बीड जिल्ह्यात यापूर्वी झालेल्या आंदोलनाच्या वेळी जाळपोळीच्या गंभीर घटना घडल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर आणि मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाची तीव्रता वाढत असल्याचे लक्षात घेऊन पोलिस आणि जिल्हा प्रशासनाने सोमवारी तातडीने इंटरनेट सेवा बंद केली. अंतरवाली सराटी येथे कार्यकर्ते अमू नयेत यासाठी अंबड तालुक्यात संचारबंदी लागू करण्यात आली, जालना, बीड व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मोठा पोलिस बंदोबस्त होता. जरांगे-पाटील परतल्याने सोमवारी मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू केली.

तीर्थपुरीत बस पेटविली जरांगे-पाटील यांचे सहकारी असलेले तीर्थपुरी नगरपंचायतचे उपाध्यक्ष शैलेंद्र पवार यांना सोमवारी पहाटे पोलिसांनी राहत्या घरातून ताब्यात घेतले. त्याच्या निषेधार्थ तीर्थपुरी शहरात बंद पुकारण्यात आला होता. सोमवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात अंबड आगाराची बस पेटवून दिली, यामुळे तणावाचे वातावरण होते.जालना जिल्ह्यात बस पेटविल्याच्या घटनेनंतर एसटी बससेवा सोमवारी सकाळी ९ वाजता अचानक बंद करण्यात आली. प्रवाशांना घेऊन धावणाऱ्या बसेसही बसस्थानकामध्येच रोखण्यात आल्या होत्या. जिल्ह्यातील ५३९ बसेसचा प्रवास दोन तासांसाठी ठप्प झाला. परिणामी, बस आणि बसस्थानकांमध्ये दोन तास हजारो प्रवासी ताटकळले होते. या संधीचा फायदा घेत खासगी वाहतूकदारांनी मनमानी भाडे वसूल करीत प्रवासी वाहतूक केली. पोलिसाच्या सूचनेनंतर सकाळी ११ वाजेनंतर पुन्हा बससेवा सुरळीत करण्यात आली.

कुठे काय घडले?जालना : जिल्ह्यात प्रवेश करणाच्या १२ मार्गावर नाकेबंदी, इंटरनेट सेवा सायं. ५ वाजेपर्यंत बंद बीड: राक्षसभुवन येथे जालना आणि बीड जिल्ह्याची सीमा सील, २८ ठिकाणी नाकेबंदी, इंटरनेट सेवा सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंदछत्रपती संभाजीनगर: सायं. ५ वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद, आरटीओ, मनपा तसेच शासकीय कार्यालयातील ऑनलाइन कामावर परिणाम झाला. 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटील