शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नाणार जमिनी अधिग्रहणाची अधिसूचना रद्द, उद्योगमंत्री सुभाष देसाईंची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2018 13:55 IST

नाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्द झाल्याची महत्त्वपूर्ण माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी दिली. रत्नागिरीमधील सागवे-कात्रादेवी इथल्या नाणार येथे आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते.

रत्नागिरी- नाणार प्रकल्पाची अधिसूचना रद्द झाल्याची महत्त्वपूर्ण माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी दिली. रत्नागिरीमधील सागवे-कात्रादेवी इथल्या नाणार येथे आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरेंनीही सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. नाणारमध्ये कोणत्याही परिस्थितीत प्रकल्प होऊ देणार नाही. उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत ही घोषणा केली. तर दुसरीकडे जमिनी अधिग्रहणाची अधिसूचना रद्द करत असल्याची उद्योगमंत्री सुभाष देसाईंनी घोषणा केली आहे.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नाणार दौ-यावर आहेत. तेलशुद्धीकरण प्रकल्पाबाबत ते नेमकी काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं. नाणारमध्ये होत असलेल्या तेलशुद्धीकरण प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. भाजपप्रणीत सत्तेत सहभागी असूनही शिवसेनेनं प्रकल्पग्रस्तांच्या भूमिकेला आपला पाठिंबा दर्शवलाय. त्यामुळे नाणार प्रकल्पासंदर्भात उद्योग विभागानं काढलेला अध्यादेश रद्द करून शिवसेनेनं आपली भूमिका कृतीतूनही स्पष्ट करावी, अशी अपेक्षा नाणारवासीयांनी व्यक्त केली होती. मध्यतंरी उद्धव ठाकरे परदेशात असताना केंद्र सरकारनं शिवसेनेला अंधारात ठेवून सौदी अरेबियातल्या कंपनीबरोबर या प्रकल्पासाठी कराराला मंजुरी दिली. त्यामुळे चिडलेल्या उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली होती. त्याआधी हा प्रकल्प बळजबरीने राबवण्याचा प्रयत्न झाल्यास आपण मंत्रिपद सोडू, अशी भूमिका शिवसेना नेते आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय विधिमंडळ अधिवेशनात घेतली होती.राजापूर तालुक्यातील नाणार परिसरात होणाऱ्या  रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांनी कडाडून विरोध केला. या परिसरातील ग्रामस्थांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली होती. त्यावेळी आपण प्रकल्पग्रस्तांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले होते. त्यानुसार उद्धव ठाकरे नाणार दौ-यावर आले होते. त्याच वेळी नाणारमधल्या जमिनी अधिग्रहणाची अधिसूचना रद्द केल्याची माहिती सुभाष देसाई यांनी दिली आहे.  

टॅग्स :Subhash Desaiसुभाष देसाईUddhav Thackerayउद्धव ठाकरे