नागपुरी संत्र्याच्या उत्पादनवाढीवर भर!
By Admin | Updated: July 29, 2014 23:23 IST2014-07-29T23:23:16+5:302014-07-29T23:23:16+5:30
विदर्भातील नागपुरी संत्र्याला स्वतंत्र ओळख मिळाल्यांनतर, या संत्र्याच्या उत्पादनवाढीवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने लक्ष केंद्रित केले

नागपुरी संत्र्याच्या उत्पादनवाढीवर भर!
अकोला : विदर्भातील नागपुरी संत्र्याला स्वतंत्र ओळख मिळाल्यांनतर, या संत्र्याच्या उत्पादनवाढीवर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने लक्ष केंद्रित केले असून, यासाठी शेतावर घनदाट लागवड पद्धतीचा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून हेक्टरी 25 टन उत्पादन घेण्याचे उदिष्ट विद्यापीठाने ठेवले आहे.
विदर्भात संत्र्याचे जवळपास 1 लाख 5क् हजार हेक्टर क्षेत्र आहे; पंरतु उत्पादन हेक्टरी 3 ते 1क् टन एवढेच मर्यादित आहे. हेक्टरी 1क् टन उत्पादन घेणारे शेतकरी अतिशय कमी आहेत. देश, विदेशात मागणी असलेल्या या संत्र्याचे उत्पादन वाढल्यास विदर्भातील शेतकरी संपन्न होतील, म्हणूनच विद्यापीठाने याकडे लक्ष केंद्रित केले आहे.
इंडो-इस्नयल या नावाने राबविण्यात येणा:या प्रकल्पाची सुरुवात नागपूर, अमरावतीमध्ये शेतक:यांच्या शेतामध्ये करण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी प्रयोगशाळा व संत्र्याची रोपवाटिका उभारण्यात आली आहे.
या प्रकल्पासोबतच कृषी विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान विभागाकडून संत्र्यावर स्वतंत्र संशोधन सुरू आहे. या प्रकल्पातंर्गत संत्र रोपांची नर्सरीही विकसित करण्यात आली आहे. शेतक:यांना दज्रेदार संत्र्याची रोपे मिळावीत, याकरिता या नर्सरीमधून विषाणू व रोगमुक्त सक्षम संत्र रोपे तयार करण्यात येत आहेत. त्यासाठी उतीसंवर्धन व संत्र्यासाठी लागणारे विविध संशोधन या नर्सरीत व प्रयोगशाळेत करण्यात येत आहे.
दरम्यान, हिमाचल प्रदेशातून गलगल जातीच्या संत्र्यांची रोपे आल्याने, येथील संत्र फळझाडांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे उत्पादकता घटली आहे. या गलगल रोपांचा शोध शासकीय व इतर ठिकाणच्या नर्सरींतून घेतला जात आहे. यावर एक कोटी रुपये खर्च केले जाणार असून, रोगमुक्त रोपे तयार करण्यासाठी स्वतंत्र प्रयोगशाळा उभारण्यासाठी सहा कोटी रुपये खर्च केला जाणार आहे.
विदर्भातील मुख्य पिकांमध्ये मोडणा:या, संत्र पिकावर संशोधन केल्यास, विदर्भातील शेती अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल. त्याच उद्देशाने नागपुरी संत्र्यावर वेगवेगळे संशोधन करून उत्पादन कसे वाढविता येईल, यावर कृषी विद्यापीठाचा भर आहे.
(प्रतिनिधी)
4विदर्भातील नागपुरी संत्र्याची देश, परदेशात मागणी आहे. म्हणूनच या संत्र्याच्या उत्पादन वाढीवर भर देण्यात येत आहे. त्यासाठी पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत असून, हेक्टरी 25 टन उत्पादनाची अपेक्षा आहे; पंरतु प्रत्यक्षात संत्रफळ आल्यावरच या प्रकल्पाची उपयोगिता समजू शकणार आहे.
-डॉ. डी.एम. पंचभाई, संत्र प्रकल्प समन्वयक,
इंडो-इस्रायल, डॉ. पंदेकृवि, अकोला