नागपूर हिवाळी अधिवेशन, स्वतंत्र विदर्भावरुन सत्ताधा-यांमध्ये संघर्ष

By Admin | Updated: December 7, 2015 12:33 IST2015-12-07T12:22:20+5:302015-12-07T12:33:43+5:30

अपेक्षेप्रमाणे श्रीहरी अणे यांच्या विधानावरुन सत्ताधा-यांमध्ये हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संघर्ष झाला.

The Nagpur Winter Session, the conflict between the independent Vidharbha and the power struggle | नागपूर हिवाळी अधिवेशन, स्वतंत्र विदर्भावरुन सत्ताधा-यांमध्ये संघर्ष

नागपूर हिवाळी अधिवेशन, स्वतंत्र विदर्भावरुन सत्ताधा-यांमध्ये संघर्ष

ऑनलाईन लोकमत 

नागपूर, दि. ७ - हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्या विधानावरुन नागपूर विधिमंडळाच्या आवारात सत्ताधारी शिवसेना-भाजपमध्ये जुंपल्याचे चित्र पाहायला मिळाले. स्वतंत्र विदर्भाचे समर्थन करणारे राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्या हकालपट्टीच्या मागणीसाठी विधिमंडळाबाहेर शिवसेनेने आंदोलन केले. 

यावेळी शिवसेनेने संयुक्त महाराष्ट्राचा नारा दिला तर, भाजपकडून स्वतंत्र विदर्भाच्या घोषणा देण्यात आल्या. शेतक-यांना कर्जमुक्ती, शेतक-यांच्या आत्महत्या आणि महागाई असे अनेक गंभीर विषय राज्यासमोर असताना सत्ताधा-यांमध्ये स्वतंत्र विदर्भावरुन संघर्ष सुरु आहे. मूळ मुद्यावरुन लक्ष हटवण्यासाठी सरकारची ही खेळी असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. 
काय म्हणाले होते अणे 
विदर्भ महाराष्ट्रात यावा यासाठी १०६ जण हुतात्मे झाले, असे मुंबईकरांचे सांगणे म्हणजे थोतांड आहे. मुळात त्यांनी मुंबईसाठी हौतात्म्य पत्करले होते. विदर्भ राज्याची निर्मिती शक्य आहे. जनतेलाही तेच हवे आहे व यासाठी केंद्र शासनाने पुढाकार घ्यावा, असे अणे शनिवारी नागपुरात एका कार्यक्रमादरम्यान म्हणाले होते.

Web Title: The Nagpur Winter Session, the conflict between the independent Vidharbha and the power struggle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.