नागपुरात उद्या ठिय्या होणारच!

By Admin | Updated: November 29, 2014 01:39 IST2014-11-29T01:39:39+5:302014-11-29T01:39:39+5:30

ठोस आश्वासन त्यांच्याकडून न मिळाल्याने 30 नोव्हेंबरच्या ठिय्या आंदोलनावर आम्ही ठाम आहोत, अशी माहिती शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी शुक्रवारी दिली़

Nagpur will start tomorrow! | नागपुरात उद्या ठिय्या होणारच!

नागपुरात उद्या ठिय्या होणारच!

शरद जोशी यांचा इशारा : मुख्यमंत्र्यांकडून ठोस आश्वासन न मिळाल्याने निर्णय
नागपूर : शेतक:यांच्या विविध प्रश्नांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली. पण शेतकरी समाधानी होतील असे कोणतेही ठोस आश्वासन त्यांच्याकडून न मिळाल्याने 30 नोव्हेंबरच्या ठिय्या आंदोलनावर आम्ही ठाम आहोत, अशी माहिती शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी शुक्रवारी दिली़
नागपुरातील रामगिरी या मुख्यंमत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी शुक्रवारी सकाळी मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद जोशी यांच्यासह शेतकरी संघटनेच्या नेत्यांची बैठक झाली़ बैठकीनंतर जोशी यांनी आंदोलनावर ठाम असल्याची भूमिका जाहीर केली़ चर्चेदरम्यान आम्ही मुख्यमंत्र्यांकडे शेतक:यांची दयनीय अवस्था मांडली व त्याला भरीव मदतीची गरज व्यक्त केली. यावर मुख्यमंत्र्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या आर्थिक अडचणी सांगितल्या व शेतक:यांच्या प्रश्नावर सरकार गंभीर असून, पुढच्या काळात त्यांच्या हितासाठी राबविणा:या योजनांची माहिती दिली. संघटनेने केलेल्या मागण्या केंद्र सरकारकडे पाठवू तसेच राज्य शासनाकडूनही त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करू. सरकार स्थापन होऊन फक्त एकच महिना झाला आहे. दोन दिवसांत या मागण्या पूर्ण करणो शक्य नाही. त्यामुळे यासाठी काही वेळ द्यावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी केली. पण कजर्माफी, वीजबिल माफ, शेतक:यांसाठी विशेष मार्शल प्लॅन याबाबत त्यांनी काहीच ठोस आश्वासन दिले नाही. शेतकरी समाधानी होतील असे त्यांच्याकडून काहीच पदरी न पडल्याने 3क् नोव्हेंबर रोजी ठिय्या आंदोलन करणार असल्याचे ते म्हणाल़े बैठकीत जोशी यांच्यासमवेत शेतकरी संघटनेचे प्रांताध्यक्ष गुणवंत पाटील हंगर्गेकर, माजी आमदार वामनराव चटप, सरोज काशीकर आदी उपस्थित होते.
कापूस, सोयाबीन, धानाच्या हमी भावात वाढ, सरसकट सर्व शेतक:यांना कजर्माफी व वीजबिलमाफी,  शेतक:यांसाठी विशेष योजना (मार्शल प्लॅन),  शेतक:यांसाठी विशेष निधीची उभारणी आदी शेतकरी संघटनेच्या मागण्या आहेत. (प्रतिनिधी)
 
च्मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेच कापूस, सोयाबीन, भात, कजर्मुक्ती, 
वीजबिल मुक्ती आणि शेतमालाचे वाढीव भाव, स्वतंत्र विदर्भाची मागणी 
आदी मुद्दय़ांचा अंतर्भाव होता. 
च्विरोधी पक्षात असताना आमदार म्हणून फडणवीस यांनी याच मागण्या तत्कालीन सरकारकडे केल्या होत्या. याकडेही त्यांचे लक्ष वेधण्यात आले. त्याला त्यांनी सहमतीही दर्शविली. 
 
मुख्यमंत्र्यांनी 
दिलेली आश्वासने
च्शेतक:यांसाठी सौरपंपाची योजना
च्हिंस्त्र प्राण्यांपासून संरक्षणासाठी सौर कुंपण
च्दुष्काळी भागासाठी वीजबिल, कर्ज माफी
च्सर्पदंश झाल्याने शेतकरी दगावल्यास आर्थिक मदत

 

Web Title: Nagpur will start tomorrow!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.