शहरं
Join us  
Trending Stories
1
अबुझमाडच्या जंगलात २७ नक्षलींना कंठस्नान; असे घडले एनकाउंटर
2
आजचे राशीभविष्य, २२ मे २०२५: नशिबाची साथ, मान-सन्मान; यश, कीर्ती, धन प्राप्तीचा दिवस
3
‘ॲापरेशन सिंदूर’नंतर रॉचे अधिकारी मराठवाड्यात; केंद्र सरकारकडून अंतर्गत सुरक्षेचा आढावा घेणे सुरू
4
नाव बसवा राजू... इनाम ५ कोटी... १५ नावांची ओळख अन् बनला सर्वोच्च नेता
5
पाकिस्तानात गृहयुद्ध : स्कूलबसवर हल्ला, सहा जणांचा मृत्यू; मृतांमध्ये तीन बालकांचा समावेश, ३८ जण जखमी 
6
‘पायरसी’मुळे सिनेमाला २२,४०० कोटींचा ‘झटका’; फटका कुणाला?
7
देवनार डम्पिंग ग्राउंडवरील बायोगॅस प्रकल्प २ वर्षांत; राज्य सरकारची मंजुरी; प्रतिदिन १८ टन बायोगॅसची निर्मिती
8
भोसले घराण्याची दौलत आहे ही ७० लाखांची तलवार
9
आमदारांना देण्यासाठी साडेपाच कोटी ठेवले रुम नं. 102मध्ये, अनिल गोटेंनी ठोकले कुलूप; संजय राऊत सरकारवर भडकले
10
IPL 2025 : मुंबईकरांसमोर दिल्लीकरांची डाळ नाही शिजली! MI नं थाटात मारली प्लेऑफ्समध्ये एन्ट्री
11
'काम करा नाहीतर निलंबित होण्यासाठी तयार रहा', मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांचा अधिकाऱ्यांना इशारा
12
ती म्हणाली होती की,... 'मॅन ऑफ द मॅच' वेळी सूर्या भाऊला आली बायकोची आठवण
13
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
14
अजित पवारांची राष्ट्रवादी 'शक्ति स्थळा'वरून फुंकणार रणशिंग! साताऱ्यात मेळावा
15
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
16
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
17
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
18
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
19
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
20
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी

नागपूरची ओळख बनणार ‘तिरंगा’!

By admin | Updated: October 29, 2016 02:17 IST

लोकमत वृत्तपत्र समूह व महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने कस्तुरचंद पार्क येथे २०० फूट उंच राष्ट्रध्वज उभारण्यात येत आहे. ही नागपूरसाठी अभिमानास्पद बाब

नागपूर : लोकमत वृत्तपत्र समूह व महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने कस्तुरचंद पार्क येथे २०० फूट उंच राष्ट्रध्वज उभारण्यात येत आहे. ही नागपूरसाठी अभिमानास्पद बाब आहे. युवकांमध्ये देशप्रेम, देशभक्ती जागविण्यासाठी हा तिरंगा प्रेरणादायी ठरेल. हा राष्ट्रध्वज येत्या काळात नागपूरच्या इतिहासातील अभिमानास्पद ओळख बनेल, असे गौरवोद्गार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काढले.या प्रकल्पाचे भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. अध्यक्षस्थानी महापौर प्रवीण दटके होते. विशेष अतिथी म्हणून लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा उपस्थित होते. या वेळी आ. सुधाकरराव देशमुख, आ. कृष्णा खोपडे, आ. अनिल सोले, आ. विकास कुंभारे, आ. डॉ. मिलिंद माने, विभागीय आयुक्त अनुपकुमार, पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम्, नासुप्र सभापती दीपक म्हैसेकर, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, स्थायी समितीचे अध्यक्ष बंडू राऊत, सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी, जलप्रदाय समितीचे अध्यक्ष संदीप जोशी, परिवहन समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर, हेरिटेज कमिटीचे अध्यक्ष व राज्याचे माजी मुख्य सचिव अरुण पाटणकर, ११८ इन्फॅन्ट्री बटालियनचे सुभेदार वीरेंद्र सिंग, माजी आ. यादवराव देवगडे, माजी उपमहापौर कृष्णराव परतेकी, सभापती सुनील अग्रवाल, गोपाल बोहरे, वर्षा ठाकरे, नगरसेवक प्रकाश तोतवानी, सुजाता कोंबाडे, प्रगती पाटील, गौतम पाटील, सारिका नांदूरकर, जयश्री वाडिभस्मे, सीमा राऊत, स्वाती आखतकर, रिता मुळे, रश्मी फडणवीस, माजी नगरसेवक मनोज साबळे, विठ्ठलराव कोंबाडे, महापालिकेचे कार्यकारी अभियंता (प्रकल्प) नरेश बोरकर, पेंच प्रकल्प सेलचे प्रकल्प अभियंता संदीप लोखंडे, उपविभागीय अभियंता धनंजय मेंडुलकर, प्रकल्प व्यवस्थापकीय सल्लागार आर. जगताप, लोकमतचे संचालक (परिचालन) अशोक जैन, लोकमत वृत्तपत्र समूहाचे सहायक उपाध्यक्ष नीलेश सिंग उपस्थित होते. वास्तुविशारद शांतनु भल्ला, जे.सी. भल्ला, कपिल भल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प साकारला जात असून तो सहा महिन्यांत पूर्णत्वास येईल, असा विश्वास लोकमत व महापालिकेने व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)नव्या पिढीत राष्ट्रप्रेम जागविणार - विजय दर्डा धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर देशाची कर्मभूमी, मर्मभूमी व हृदयस्थळ झीरो माईल असलेल्या नागपूर शहरातील कस्तुरचंद पार्कवर राष्ट्रध्वज उभारण्याच्या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले. नव्या पिढीत राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करणे, त्यांना तिरंग्याचे महत्त्व समजावे या उद्देशाने हा प्रकल्प उभारला जात आहे, असे लोकमत एडिटोरिअल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांनी सांगितले. संसदेतही तिरंगा बॅच लावून प्रवेश मिळावा, यासाठी आपण गेली १८ वर्षे आग्रह धरला; शेवटी त्यात यश मिळाले. आपण विजय मिळवितो तेव्हा तिरंग्याच्या साक्षीने जल्लोष करतो. हा तिरंगा विजयाचेही प्रतीक ठरेल. येत्या काळात हे एक प्रेक्षणीय स्थळदेखील होईल, असेही दर्डा यांनी सांगितले.२००९ पासून सुरू होता संघर्षलोकमत वृत्तपत्र समूहाला राष्ट्रध्वज स्तंभ उभारण्यासाठी २००९पासून सतत संघर्ष करावा लागला. या दरम्यान सरकारही बदलले. अधिकारी बदलले. मात्र, लोकमत वृत्तपत्र समूह आपल्या ध्येयावर कायम राहिले. विजय दर्डा यांनी यासाठी सातत्याने संघर्ष केला. खासदार असताना दर्डा यांनी पालकमंत्री, जिल्हाधिकारी, विमानतळ प्राधिकरण, महापालिका, नागपूर सुधार प्रन्यास व अन्य संबंधित विभागांशी पत्रव्यवहार केला. एवढेच नव्हे तर राष्ट्रीय उत्सवात लोकप्रतिनिधींच्या हस्ते ध्वजारोहण करण्यासाठी त्यांनी तत्कालीनकेंद्रीय गृहमंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळातील अन्य मंत्री, विधान परिषदेचे नेते, विरोधी पक्षनेते, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनाही पत्र लिहिले. त्यांनी मुंबईतील चौपाटीवर २०७ फूट उंच तिरंगा झेंडा लावण्याबाबत प्रस्तावित असलेल्या प्रकल्पाबाबत तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चाही केली.नागपुरात उंच राष्ट्रध्वज लावण्याकरिता हेरिटेज कमिटीची मंजुरी मिळण्यासाठीही त्यांनी पत्रव्यवहार केला. या सर्व संघर्षानंतर २८ जुलै २०१६ रोजी महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत लोकमत वृत्तपत्र समूह व नागपूर महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रध्वजासह २०० फूट उंच ध्वजस्तंभ उभारण्याच्या प्रकल्पास मंजुरी देण्यात आली.लोकमतने सामाजिक बांधिलकी जपली - गडकरीलोकमत वृत्तपत्र समूहातर्फे समाज व देशहित डोळ्यासमोर ठेवून विविध उपक्रम राबविले जातात. देशसेवेच्या प्रत्येक उपक्रमात लोकमतचा पुढाकार असतो. मोवाड पूर, लातूर भूकंप, कारगिलचे युद्ध आदी प्रसंगी लोकमतने मदतीसाठी घेतलेला पुढाकार सर्वांनीच अनुभवला आहे.पुन्हा एकदा या राष्ट्रध्वज प्रकल्पाच्या माध्यमातून लोकमतने आपली समाज व देशाप्रति असलेली बांधिलकी स्पष्ट केली आहे, अशी प्रशंसा गडकरी यांनी ‘लोकमत’ची केली.