नागपूर - चक्रीघाटात दोन बसेसची धडक, 20 प्रवासी प्रवासी

By Admin | Updated: September 17, 2016 11:45 IST2016-09-17T11:45:08+5:302016-09-17T11:45:08+5:30

कोंढाळी- काटोल मार्गावरील चक्रीघाटात दोन एसटी बसची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला आहे. या अपघातात २० प्रवासी जखमी झाले आहेत

Nagpur - Two buses hit by 20 buses in Chakrigha, 20 passenger passengers | नागपूर - चक्रीघाटात दोन बसेसची धडक, 20 प्रवासी प्रवासी

नागपूर - चक्रीघाटात दोन बसेसची धडक, 20 प्रवासी प्रवासी

>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 17 - कोंढाळी- काटोल मार्गावरील चक्रीघाटात दोन एसटी बसची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला आहे. या अपघातात २० प्रवासी जखमी झाले आहेत. ४ जण गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी नागपूर मेडिकलमध्ये भरती करण्यात आलं आहे. 
कोंढाळी - सावनेर एसटी बस (एमएच-४०/एन-९५५८) व काटोलकडून येणारी एसटी बस (एमएच-४०/८५६४) या दोन बसची कोंढाळी - काटोल मार्गावर चक्रीघाटात समोरासमोर धडक झाली. अपघातात २० प्रवासी जखमी झाले आहेत. यापैकी गंभीर जखमी प्रवासी सिंधू मुंगभाते (३५, रा शिवा), लक्ष्मी भाऊराव साठोणे (५८), अशोक डेंगे (५३, रा शिवा) यांना नागपूर मेडिकलमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले आले. उर्वरित जखमींवर कोंढाळी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत.                          
 

Web Title: Nagpur - Two buses hit by 20 buses in Chakrigha, 20 passenger passengers