शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्रचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
4
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
5
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
6
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
7
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
8
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
9
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
10
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
11
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
12
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
13
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
14
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...
15
धक्कादायक! रजनीकांत यांच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी, पोलिसांकडून तातडीने तपास
16
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
17
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
18
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
19
Dev Diwali 2025: देवदिवाळी नेमकी कधी? १ की २१ नोव्हेंबरला? हा गोंधळ कशामुळे? वाचा!
20
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...

पारा घसरला, आता पुन्हा थंडी वाढणार, पुढचे १० दिवस थंडीचा प्रभाव

By निशांत वानखेडे | Updated: January 18, 2025 19:36 IST

Winter News: गेल्या चार पाच दिवसांपासून आकाशात दाटलेले ढगांचे आच्छादन शनिवारी बऱ्यापैकी निवळले. त्यामुळे किमान तापमानात माेठ्या फरकाने घसरण झाली व हलक्या थंडीची जाणीव झाली. आता पुन्हा पाऱ्यात घसरण हाेऊन थंडी वाढण्याची शक्यता आहे.

- निशांत वानखेडेनागपूर - गेल्या चार पाच दिवसांपासून आकाशात दाटलेले ढगांचे आच्छादन शनिवारी बऱ्यापैकी निवळले. त्यामुळे किमान तापमानात माेठ्या फरकाने घसरण झाली व हलक्या थंडीची जाणीव झाली. आता पुन्हा पाऱ्यात घसरण हाेऊन थंडी वाढण्याची शक्यता आहे. कडाक्याची नसली तरी हलक्या थंडीचा प्रभाव पुढचे दहा दिवस जाणवत राहिल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

नागपूरसह विदर्भातील हा संपूर्ण आठवडा ढगाळ वातावरणात गेला. आकाश पूर्ण ढगांनी व्यापले राहिले. ढगांमुळे रात्रीचा पारा माेठ्या फरकाने उसळला. गेले पाच दिवस किमान तापमान १५ ते १७ अंशाच्या दरम्यान म्हणजे सरासरीपेक्षा ३ ते ५ अंशाने अधिक हाेते. दुसरीकडे दिवसाचा पारा मात्र २६ ते २५ अंशापर्यंत घसरला हाेता. त्यामुळे दिवसा गारव्याची अनुभूती व रात्री उबदारपणा जाणवत राहिला. शनिवारी २४ तासात नागपूरचा रात्रीचा पारा ३.१ अंशाने घसरला व १४ अंशाची नाेंद झाली, जी सरासरीत आहे. त्यामुळे पहाटेच्या वेळी काहीशा गारव्याची अनुभूती जाणवली. विदर्भातील इतर जिल्ह्यातही रात्रीचा पारा घसरला असून बहुतेक शहरात तापमान १४ अंशावर आले आहे. अमरावती व यवतमाळ तेवढे १५ अंशावर आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार यापुढचे काही दिवस पारा सरासरी किंवा त्यापेक्षा खाली जावून थंडी वाढण्याची शक्यता आहे. हे कदाचित थंडीचे शेवटचे आवर्तन असेल, असाही अंदाज आहे.

यामुळे वाढेल थंडी- गुजरातपासून राजस्थानपर्यंत समुद्रसपाटीपासून एक किमी. उंचीपर्यंत कमी दाबाचा तिरपा आस तयार झाला.- उत्तर भारतात एकापाठोपाठ मार्गस्थ होणारे पश्चिमी प्रकोप आणि अरबी समुद्रातून नैरूक्त दिशेकडून येणाऱ्या आर्द्रतेचा पुरवठ्यामुळे तेथे सध्या होणारा पाऊस, बर्फवृष्टी व थंडी आहे- ओरिसावरील उच्चं दाब क्षेत्र आता राजस्थान मध्य प्रदेशकडे सरकले आहे.- त्यामुळे घड्याळकाटा दिशेने वहन होणाऱ्या प्रत्यावर्ती चक्रीय वाऱ्यामुळे उत्तर भारतातील थंडी, बिहार व झारखंडमार्गे पूर्वेकडून महाराष्ट्रात खेचल्या जाण्याची शक्यता आहे.-- या प्रभावाने आता पुढील १० दिवसात थंडीची शक्यता निर्माण झाली आहे.- ही थंडी नागपूरसह विदर्भात अधिक जाणविण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

टॅग्स :weatherहवामानMaharashtraमहाराष्ट्रnagpurनागपूर