नागपूर शिक्षक मतदारसंघ, आज फेरमतदान
By Admin | Updated: February 5, 2017 23:46 IST2017-02-05T23:46:33+5:302017-02-05T23:46:33+5:30
विधान परिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातील मतदान केंद्र क्रमांक २५ (मनपा मराठी प्राथमिक शाळा, क्रमांक १, नवीन नंदनवन, नागपूर) येथे फेरमतदान घेण्याचे आदेश देण्यात आले असून

नागपूर शिक्षक मतदारसंघ, आज फेरमतदान
नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघातील मतदान केंद्र क्रमांक २५ (मनपा मराठी प्राथमिक शाळा, क्रमांक १, नवीन नंदनवन, नागपूर) येथे फेरमतदान घेण्याचे आदेश देण्यात आले असून, सोमवार, ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत या एका मतदान केंद्रावर फेरमतदान घेतले जाईल.
या वेळी मतदारांच्या उजव्या हाताच्या अनामिकेवर पक्की शाई लावली जाईल. नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघात गेल्या ३ फेब्रुवारी रोजी मतदान झाले.
या मतदानाच्या वेळी मतदान केंद्र क्रमांक २५ येथे योग्य मतदान प्रक्रियेचा अवलंब केला गेला नसल्याने भारत निवडणूक आयोगाने एका आदेशाद्वारे या मतदान केंद्रावर ६ फेब्रुवारी रोजी फेरमतदान घेण्याचा आदेश दिला.