नागपुरात विद्यार्थ्यांनी तलवारीने कापला केक
By Admin | Updated: February 16, 2016 15:20 IST2016-02-16T15:07:01+5:302016-02-16T15:20:17+5:30
नागपूर महापालिकेच्या कपिलनगर हिंदी शाळेत सुफी संत ताजुद्दीन बाबा यांच्या वाढदिवसानिमित्त ठेवण्यात आलेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी चक्क तलवारीनेच केक कापला आहे
नागपुरात विद्यार्थ्यांनी तलवारीने कापला केक
>
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 16 - नागपूर महापालिकेच्या कपिलनगर हिंदी शाळेत विद्यार्थ्यांनी चक्क तलवारीने केक कापल्याची घटना घडलीये. 27 जानेवारीची ही घटना असून कपिलनगर हिंदी शाळेत सुफी संत ताजुद्दीन बाबा यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता, त्यावेळी विद्यार्थ्यांनी चक्क तलवारीनेच केक कापला आहे.
पोलिसांनी हा सर्व प्रकार गंभीरतेने घेतला असून शाळेत अशा प्रकारे तलवार आणण्याची परवानगी मिळाली कशी ? याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.
नागपुरातल्या कायदा सुव्यवस्थेवरुन विरोधकांनी अनेकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धारेवर धरल आहे. अधिवेशनादरम्यानदेखील विरोधकांनी याच मुद्यावर गोंधळदेखील घातला होता.