नागपूरचे अधिवेशन 24ला गुंडाळणार
By Admin | Updated: November 30, 2014 01:18 IST2014-11-30T01:18:14+5:302014-11-30T01:18:14+5:30
भाजपाच्या सत्ताकाळातील पहिले अधिवेशन हिवाळी 8 डिसेंबरला सुरू करून 24 डिसेंबरला गुंडाळले जाईल, अशी शक्यता आहे.

नागपूरचे अधिवेशन 24ला गुंडाळणार
मुंबई : नागपूर करारानुसार विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन किमान एक महिन्याचे असले पाहिजे, असा आग्रह विरोधी पक्षात असताना धरणा:या भाजपाच्या सत्ताकाळातील पहिले अधिवेशन हिवाळी 8 डिसेंबरला सुरू करून 24 डिसेंबरला गुंडाळले जाईल, अशी शक्यता आहे.
विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक शनिवारी विधानभवनात झाली. तीत 8 ते 18 डिसेंबर्पयतचे कामकाज निश्चित केले. 18 तारखेला समिती बैठक नागपुरात होईल आणि पुढील कामकाज ठरविले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. आधी हे अधिवेशन 8 ते 27 डिसेंबर्पयत होईल, असे सत्ताधारीही सांगत होते. मात्र, आता 25 तारखेला असलेली नाताळची सुट्टी लक्षात घेता त्यानंतर केवळ दोन दिवसांसाठी कामकाज चालवायचे या बाबतचा निर्णय 18 तारखेला होणार आहे. नाताळानंतर दोन दिवस कामकाज करण्याऐवजी 8 ते 24 डिसेंबरदरम्यान एक किंवा दोन शनिवारी कामकाज करण्यावरही विचार होऊ शकतो. (विशेष प्रतिनिधी)