आर्चीला पाहण्यासाठी नागपूरकर 'सैराट'
By Admin | Updated: September 16, 2016 16:37 IST2016-09-16T16:30:19+5:302016-09-16T16:37:03+5:30
‘सैराट’ सिनेमातील आर्ची अर्थात अभिनेत्री रिंकू राजगुरुची क्रेझ अद्यापही कमी झालेली नाही. नागपूरमध्येही याचा प्रत्यय आला.

आर्चीला पाहण्यासाठी नागपूरकर 'सैराट'
ऑनलाइन लोकमत
नागपूर,दि.16-‘सैराट’ सिनेमातील आर्ची अर्थात अभिनेत्री रिंकू राजगुरुची क्रेझ अद्यापही कमी झालेली नाही. नागपूरमध्येही याचा प्रत्यय आला. रिंकु राजगुरू हिची एक झलक पाहण्यासाठी नागपुरकरांनी तोबा गर्दी केली होती.
नागपुरातील एकता गणेश मंडळाला रिंकुने भेट दिली असता तिची एक झलक पाहण्यासाठी युवक सैराट झाले होते. रिंकू सोबत आमदार प्रकाश गजभिये आणि माजी मंत्री अनिलबाबू देशमुख हे देखील उपस्थित होते. यावेळी रिंकूचा सत्कारही कऱण्यात आला. रिंकू व्यासपीठावर येताच तिला पाहण्यासाठी जमलेल्यांनी एकच जल्लोष केला. यावेळी आर्चीने व्यासपीठावरून सगळ्यांचे अभिवादन केले.