शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर-मुंबई प्रवासाची 'समृद्धी' ५ जूनपासून; शेवटच्या टप्प्याचा लोकार्पणासाठी मुहूर्त ठरला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 08:22 IST

शेवटचा ७६ किलोमीटर लांबीचा मार्गही प्रवासी सेवेत दाखल होणार

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: नागपूर ते मुंबई विनाअडथळा प्रवास गुरुवार, ५ जूनपासून करणे आता शक्य होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ५ जूनला समृद्धी महामार्गाच्या बहुप्रतीक्षित शेवटच्या टप्प्याचे इगतपुरी येथील सोहळ्यात लोकार्पण केले जाणार आहे. त्यामुळे आता या महामार्गाचा इगतपुरी ते आमने हा शेवटचा ७६ किलोमीटर लांबीचा मार्गही प्रवासी सेवेत दाखल होणार आहे, अशी माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांनी दिली.

मुंबई ते नागपूर जलद प्रवासासाठी 'एमएसआरडीसी'ने ७०१ किलोमीटर लांबीच्या प्रवेशनियंत्रित महामार्गाची उभारणी केली आहे. आतापर्यंत त्यातील ६२५ किलोमीटर लांबीचा महामार्ग खुला झाला झाला आहे. आता गुरुवारपासून शेवटच्या टप्प्यातील महामार्ग खुला झाल्यानंतर नागपूर येथून निघालेल्या वाहनांना थेट मुंबईच्या वेशीवर आठ तासांत पोहोचता येणार आहे. दरम्यान, समृद्धी महामार्गाचे काम एप्रिलमध्येच पूर्ण झाले होते.

पंतप्रधान मोदी यांची वेळ मिळू शकली नाही....

  • 'एमएसआरडीसी'ने या महामार्गाच्या लोकार्पणासाठी एप्रिलमध्ये राज्य सरकारकडे वेळ मागितली होती. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पणासाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविला होता.
  • तेव्हाच्या नियोजनानुसार शेवटचा टप्पा महाराष्ट्र दिनी, १ मे रोजी प्रवासासाठी खुला केला जाणार होता. त्यादृष्टीने 'एमएसआरडीसी'ने हालचालीही सुरू केल्या होत्या.
  • मात्र, त्यावेळी पंतप्रधान मोदी यांची वेळ मिळू शकली नाही. त्यामुळे या मार्गाचे उद्घाटन लांबणीवर पडले.

महामार्गाचे आतापर्यंतचे टप्पे

  • समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी हा ५२० किमीचा पहिला टप्पा डिसेंबर २०२२ मध्ये खुला झाला होता. तर, दुसऱ्या टप्प्यात शिर्डी ते भरवीर, असा जवळपास ८० किलोमीटरचा मार्ग वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला होता.
  • तर, गेल्यावर्षी वर्षी तिसऱ्या टप्प्यात 'एमएसआरडीसी'ने भरवीर ते इगतपुरी हा आणखी २५ किलोमीटरचा मार्ग सुरू केला. त्यामुळे सद्यस्थितीत नागपूरवरून निघालेली वाहने थेट इगतपुरीपर्यंत विनाअडथळा पोहोचत आहेत.
  • या बोगद्यांच्या भागात रेखाटली चित्रे
  • इगतपुरी ते आमने या ७६ किलोमीटरच्या डोंगराळ भागात 'समृद्धी'वर पाच बोगदे आहेत. त्यांची एकत्रित लांबी ११ किमी असून, त्यात इगतपुरी येथील ७.७८ किमीचा राज्यातील सर्वाधिक लांबीचा बोगदाही आहे. या बोगद्यामुळे इगतपुरी ते कसारा हे अंतर आता आठ मिनिटांमध्ये पार करता येईल.
टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गnagpurनागपूरMumbaiमुंबई