नागपूरमध्ये तडीपार गुंडाची अल्पवयीन मुलांकडून हत्या
By Admin | Updated: November 1, 2015 19:53 IST2015-11-01T19:53:15+5:302015-11-01T19:53:15+5:30
नागपूरमध्ये सराईत गुंड रोहित सोनकरची दोन अल्पवयीन मुलांनी हत्या केल्याची घटना समोर आली आहे. रोहितच्या त्रासाला कंटाळून ही हत्या झाल्याचे समजते.

नागपूरमध्ये तडीपार गुंडाची अल्पवयीन मुलांकडून हत्या
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. ११ - नागपूरमध्ये सराईत गुंड रोहित सोनकरची दोन अल्पवयीन मुलांनी हत्या केल्याची घटना समोर आली आहे. रोहितच्या त्रासाला कंटाळून ही हत्या झाल्याचे समजते. रोहित हा तडीपार गुंड असून नागपूर पोलिसांनी दोन वर्षांसाठी त्याला तडीपार केले होते.
नागपूरमधील गिट्टीखानी परिसरात रोहित सोनकरचा मृतदेह आढळला आहे. पोलिस तपासात रोहितची हत्या दोन अल्पवयीन मुलांनी केल्याचे उघड झाले आहे. रोहित या मुलांना त्रास देत होता व त्यांच्याकडून वारंवार पैशांची मागणी करत होता. याला कंटाळूनच दोघा अल्पवयीन मुलांनी रोहितची हत्या केल्याचे वृत्त आहे. मात्र रोहितला तडीपार केले असतानाही तो राजरोसपणे शहरात कसा फिरत होता असा सवाल उपस्थित होत आहे. या घटनेमुळे नागपूर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.