नागपूर मध्यवर्ती कारागृहास मुख्यमंत्र्यांची अचानक भेट !

By Admin | Updated: April 21, 2015 01:14 IST2015-04-21T01:14:42+5:302015-04-21T01:14:42+5:30

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी अचानक मध्यवर्ती कारागृहाला भेट देत तब्बल तासभर कारागृहाची पाहणी केली़ यावेळी मुख्यमंत्र्यांनी जेल ब्रेकचा स्पॉट

Nagpur Central Jail Chief Minister's sudden visit! | नागपूर मध्यवर्ती कारागृहास मुख्यमंत्र्यांची अचानक भेट !

नागपूर मध्यवर्ती कारागृहास मुख्यमंत्र्यांची अचानक भेट !

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी अचानक मध्यवर्ती कारागृहाला भेट देत तब्बल तासभर कारागृहाची पाहणी केली़ यावेळी मुख्यमंत्र्यांनी जेल ब्रेकचा स्पॉट बघितला आणि विविध बराकींसह अंडासेलचीही पाहणी केली.
जेल ब्रेकच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समितीची घोषणा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची तुरुंग प्रशासनाकडून बारीकसारीक माहिती घेतली. विदेश दौऱ्याहून परतल्यानंतर सोमवारी मुख्यमंत्री नागपुरात आले. विमानतळावर उतरल्यानंतर त्यांनी चालकाला थेट मध्यवर्ती कारागृहाकडे जाण्याचे निर्देश दिले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचा काफिला सकाळी ८.३० च्या सुमारास मध्यवर्ती कारागृहाच्या प्रवेशद्वारावर धडकला. अचानकपणे मुख्यमंत्री कारागृहात पोचल्यामुळे प्रशासनाची भंबेरी उडाली. मुख्यमंत्र्यांनी प्रारंभी ज्या बराकीतून कैदी पळाले, ती बराकी तसेच ज्या दिशेने कैदी पळाले, तो आतबाहेरचा भाग, भिंतीचे निरीक्षण केले. कारागृहाच्या सुरक्षेचा आढावा घेतानाच येथे आणखी काय सुधारणा करायला हव्यात त्याचीही माहिती घेतली. यावेळी त्यांच्यासोबत पोलीस आयुक्त एस.पी. यादव, सहआयुक्तअनुपकुमार सिंह होते. (प्रतिनिधी)

Web Title: Nagpur Central Jail Chief Minister's sudden visit!