नागपूर - काँग्रेस नगरसेवक गुड्डू तिवारींवर हल्ला
By Admin | Updated: July 1, 2016 14:30 IST2016-07-01T14:30:57+5:302016-07-01T14:30:57+5:30
काँग्रेस नगरसेवक गुड्डू उर्फ योगेश तिवारी यांच्यावर आठ ते दहा सशस्त्र हल्लेखोरांनी आज दुपारी हल्ला चढवला. प्रसंगावधान राखल्याने तिवारी या हल्लयातून बचावले

नागपूर - काँग्रेस नगरसेवक गुड्डू तिवारींवर हल्ला
>ऑनलाइन लोकमत -
नागपूर, दि. 01 - काँग्रेस नगरसेवक गुड्डू उर्फ योगेश तिवारी यांच्यावर आठ ते दहा सशस्त्र हल्लेखोरांनी आज दुपारी हल्ला चढवला. प्रसंगावधान राखल्याने तिवारी या हल्लयातून बचावले.
उंटखाना (ईमामवाडा) प्रभागाचे काँग्रेसचे नगरसेवक असलेले तिवारी नेहमीप्रमाणे आज दुपारी १२ च्या सुमारास आपल्या घराजवळ असताना हल्लेखोरांनी तलवार आणि देशी कट्ट्यासोबत हल्ल्याचा प्रयत्न केला. हल्लेखोरांनी आरडाओरडा केल्याने गुड्डू तिवारींच्या वेळीच धोका लक्षात आल्याने त्यांनी तेथून पळ काढला. आधीच सुरक्षीत ठिकाणी गेल्याने ते बचावले. या घटनेनंतर परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. गोळी झाडल्याचेही वृत्त पसरले होते. मात्र, पोलिसांनी त्याचा इन्कार केला. काही वेळासाठी ईमामवाडा परिसरात तणाव निर्माण झाला होता.