नागपूर विमानतळाच्या मास्टर प्लॅनला मंजुरी

By Admin | Updated: November 14, 2014 02:00 IST2014-11-14T02:00:37+5:302014-11-14T02:00:37+5:30

फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रलयात झालेल्या महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीच्या (एमएडीसी) बैठकीत मंजुरी देण्यात आली.

Nagpur airport master plan approval | नागपूर विमानतळाच्या मास्टर प्लॅनला मंजुरी

नागपूर विमानतळाच्या मास्टर प्लॅनला मंजुरी

मुंबई : नागपूर येथील विमानतळाचे दोन टप्प्यात नूतनीकरण करण्याच्या सुधारित मास्टर प्लॅनला आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रलयात झालेल्या महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनीच्या (एमएडीसी) बैठकीत मंजुरी देण्यात आली. 
या आधीचा मास्टर प्लॅन 2क्क्1 मध्ये तयार करण्यात आला होता. आता 2क्5क् र्पयत या विमानतळावरील वाहतूक, विमानांची आणि प्रवाशांची संख्या या घटकांचा विचार करून नवा प्लॅन तयार करण्यात आला असून त्याला आज मंजुरी मिळाली. या प्लॅननुसार 2क्15-16 मध्ये विमानतळ नूतनीकरणाच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरु होऊन ते 2क्19 मध्ये पूर्ण केले जाईल. दुस:या टप्प्याचे काम 2क्28 र्पयत पूर्ण केले जाणार आहे. दोन्ही टप्प्यांसाठी 1 हजार 5क्क् कोटी रुपये खर्च येणार आहे. 
नागपूरसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा मिहान प्रकल्पात उद्योग उभारणी वा इतर कारणांसाठी एमएडीसीमार्फत जमिनी देण्यासाठीच्या नियमांना आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. जमीन वाटप लवकरात लवकर आणि पारदर्शक पद्धतीने होण्यास त्यामुळे मदत होणार आहे. 
त्यामुळे जमिनीच्या मनमानी वाटपाला चाप बसणार असून नियमांनुसारच कार्यवाही होईल. (विशेष प्रतिनिधी)
 
च्अमरावती विमानतळावर पायाभूत सुविधा निर्माण करण्यास मंजुरी देण्यात आली.
च्मिहानच्या फॅसिलिटी सेंटरमधील परवाना शुल्क कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
च्मिहानमधील उद्योगांना एमएडीसीमार्फत वीज पुरवठा करण्याचे ठरले. एमएडीसी महाजनकोऐवजी ओपन अॅक्सेसमधून त्यासाठी वीज खरेदी करणार आहे. या संदर्भात एमईआरसीकडे आधीच परवानगी मागण्यात आली असून ती मिळताच वीज पुरवठा सुरू केला जाईल.
च्मिहाननजीक खापरी येथे 25क् फ्लॅटस् उभारण्यास तत्त्वत: मंजुरी देण्यात आली. त्यात प्रकल्पग्रस्तांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

 

Web Title: Nagpur airport master plan approval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.