नागपूर ४६.२ अंशावर

By Admin | Updated: June 1, 2014 00:57 IST2014-06-01T00:57:36+5:302014-06-01T00:57:36+5:30

मे महिन्यातील शेवटचा दिवस चांगलाच तापला. शनिवारचा दिवस यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वांधिक तापमानाचा ठरला. दुपारी नागपुरातील पारा चक्क ४६.२ अंश सेल्सिअसपर्यंंत पोहोचला होता.

Nagpur is at 46.2 degrees | नागपूर ४६.२ अंशावर

नागपूर ४६.२ अंशावर

नागपूर : मे महिन्यातील शेवटचा दिवस चांगलाच तापला. शनिवारचा दिवस यंदाच्या  उन्हाळ्यातील सर्वांधिक तापमानाचा ठरला. दुपारी नागपुरातील पारा चक्क ४६.२ अंश  सेल्सिअसपर्यंंत पोहोचला होता. त्याचवेळी ब्रह्मपुरी येथे ४६.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद  करण्यात आली. नागपुरात दुपारी ३ वाजतापर्यंत सूर्य चांगलाच आग ओकत होता. परंतु यानंतर  आकाशात अचानक ढगांची गर्दी होऊ लागली. शिवाय सायंकाळी शहरातील काही भागात तुरळक  पावसानेही हजेरी लावली. यामुळे गर्मीपासून थोडासा दिलासा मिळाला. विशेष म्हणजे, शनिवारी  दिवसभरातील कमाल व किमान तापमान सामन्यपेक्षा तीन ते चार अंश सेल्सिअस अधिक होते.  दुसरीकडे हवामान खात्याने पुढील २४ तासानंतर गर्मीचा हा कहर थोडा कमी होण्याची शक्यता  वर्तविली आहे. शिवाय वादळासह मान्सूनपूर्व पाऊसही येण्याचे संकेत दिले आहे. (प्रतिनिधी)
 

Web Title: Nagpur is at 46.2 degrees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.