पावसासाठी नागनाथ मंदिर भरले गंगेच्या पाण्याने !

By Admin | Updated: August 17, 2016 21:53 IST2016-08-17T21:53:00+5:302016-08-17T21:53:00+5:30

जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने परळी तालुक्यातील नागापूर येथील ग्रामस्थांनी थेट नागनाथालाच पाण्यात बुडवून साकडे घातले

Nagnath temple filled with water from the Ganges for rain! | पावसासाठी नागनाथ मंदिर भरले गंगेच्या पाण्याने !

पावसासाठी नागनाथ मंदिर भरले गंगेच्या पाण्याने !

ऑनलाइन लोकमत
बीड, दि. 17 - अडीच महिने उलटून गेले तरी अजूनही जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने परळी तालुक्यातील नागापूर येथील ग्रामस्थांनी थेट नागनाथालाच पाण्यात बुडवून साकडे घातले आहे. गंगेच्या पाण्याने भक्तांनी नागनाथाचे मंदिर भरून टाकत देवा, आता तरी धो-धो पाऊस पाड, अशी विनवणी केली. नागनाथाचे मंदिर गंगेच्या पाण्याने भरून टाकले की पाऊस चांगला पडतो, अशी प्राचीन काळापासूनची श्रध्दा या परिसरातील नागरिकांमध्ये आहे.

बुधवारी या परिसरातील ग्रामस्थांनी परभणी जिल्ह्यातील सोन्ना येथे जावून दक्षिणेची गंगा म्हटल्या जाणाऱ्या गोदावरी नदीतून पाणी आणून मोठ्या भक्ती भावाने नागनाथाचे मंदिर या पाण्याने भरून टाकले. तीन वर्षापूर्वीही अशा प्रकारे पाण्याने मंदिर भाविकांनी भरले होते. 

रमेश आप्पा तोडकरी, बाबू महाराज, महादेव सोळंके, दीपक सोळंके, कपिल गोसावी, धनंजय मिसाळ, हरिहर स्वामी, रमेश सोळंके, पप्पू सोळंके, कृष्णा जोशी, राम आबा, जिजा सोळंके आदींनी यासाठी परिश्रम घेतले.

Web Title: Nagnath temple filled with water from the Ganges for rain!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.