Maharashtra Nagar Parishad Election Result 2025 Update: राज्यातील २८७ नगरपरिषदा आणि नगर पंचायतीच्या निवडणुका यावेळी लक्षवेधी ठरल्या. महायुती आणि महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांनी अनेक ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढवल्या, तर काही ठिकाणी विरोधी पक्षाशीही हातमिळवणी केली. या निवडणुकांचे निकाल येण्यापूर्वीच भाजपने मात्र तीन नगर परिषदांवर आधीच झेंडा फडकावला.
राज्यातील २८७ नगरपरिषदांपैकी तीन नगर परिषदांचे निकाल आधीच स्पष्ट झाले आहेत. तीन ठिकाणी भाजपने नगराध्यक्ष पदासह नगरसेवकही निवडून आणले आहेत.
भाजपने कोणत्या नगरपरिषदा जिंकल्या?
भाजपने जळगावमधील जामनेर, सोलापूरमधील अनगर आणि धुळ्यातील दोंडाई या तीन नगर परिषदांमध्ये भाजपने विजयाचा गुलाल आधीच उधळला. या नगर परिषदांच्या नगरसेवक पदाच्या आणि नगराध्यक्षपदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत.
धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नगराध्यक्षपदी मंत्री जयकुमार रावल यांच्या आई नयनकुंवर रावल आणि सर्व नगरसेवक बिनविरोध निवडून गेले आहेत.
जळगाव जिल्ह्यातील जामनेरच्या 3 नगराध्यक्षपदी मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन या आधीच बिनविरोध निवडून गेल्या आहेत. तसेच, भाजपचे नऊ नगरसेवक देखील बिनविरोध जिंकले आहेत, पण उर्वरित १७ जागांसाठी मतदान झाले. त्याचा निकालही आज जाहीर होत आहे.
तिन्ही ठिकाणी महिला नगराध्यक्ष
ज्या तीन नगरपरिषदांचे निकाल स्पष्ट झाले आहेत, त्या तीनही नगराध्यक्षपदी महिला विराजमान झाल्या आहेत. जामनेरमध्ये साधना गिरीश महाजन, दोंडाईमध्ये नयनकुंवर जयकुमार रावल आणि अनगरमध्ये प्राजक्ता पाटील या बिनविरोध जिंकल्या आहेत.
अनगरची निवडणूक राहिली वादात
१७ नगरसेवक संख्या असलेली अनगरची नगर परिषद राज्यात चर्चेत राहिली. मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांची सून प्राजक्ता पाटील नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या आहेत. पण, त्यापूर्वी मोठे राजकीय नाट्य बघायला मिळाले.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उज्ज्वला थिटे पाटील यांनी प्राजक्ता पाटील यांच्याविरोधात नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला होता. अर्ज दाखल करताना त्यांना अडथळे आणले गेले. आधी रस्त्यावर वाहतूक कोंडी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी पोलीस बंदोबस्त घेऊन सकाळी अर्ज दाखल केला होता. पण अर्जात त्रुटी असल्याचे नमूद करत अर्ज फेटाळला होता.
Web Summary : Before official results, BJP secured three Nagar Parishads: Jamner, Angar, and Dondaicha. All three elected women presidents unopposed. Angar's election faced controversy with a rejected nomination.
Web Summary : आधिकारिक परिणामों से पहले, भाजपा ने तीन नगर परिषदों: जामनेर, अनगर और दोंडाईचा में जीत हासिल की। तीनों में महिला अध्यक्ष निर्विरोध चुनी गईं। अनगर के चुनाव में एक नामांकन खारिज होने से विवाद हुआ।