MYSTERY : पाच दिवसानंतर ओम पुरींचा मोबाईल गायब

By Admin | Updated: January 11, 2017 14:14 IST2017-01-11T13:47:42+5:302017-01-11T14:14:17+5:30

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांच्या मृत्यूच्या पाच दिवसानंतरही पोलिसांना त्यांच्या मोबाईल अजून सापडलेला नाही.

MYSTERY: Om Puri's mobile disappeared after five days | MYSTERY : पाच दिवसानंतर ओम पुरींचा मोबाईल गायब

MYSTERY : पाच दिवसानंतर ओम पुरींचा मोबाईल गायब

style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांच्या मृत्यूच्या पाच दिवसानंतरही पोलिसांना त्यांच्या गायब झालेला मोबाइल अजून सापडलेला नाही. सहा जानेवारी रोजी त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर समोर आलेल्या पोस्टमार्टम रिपोर्टमधून धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. यामध्ये  पुरी यांच्या डोक्यामध्ये इजा झाल्याचे निशाण तसेच मानेजवळील हाड आणि हेअरलाइन फ्रॅक्चर असल्याचं अहवालात म्हटलं आहे. पुढील तपासाला वेग येण्यासाठी पोलिसांसाठी ओम पुरी यांचा मोबाइल सापडणे फार आवश्यक आहे.
 
माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार, ओम पुरी यांचा मोबाइल नंदीता पुरी यांच्याकडे आहे. पण ओम पुरी यांच्या शेवटच्या कार्यात व्यग्र असल्यामुळे पोलीस लवकरच त्यांच्याकडून मोबाइल घेणार आहेत. आपल्या शेवटच्या काळात पुरी यांचे कोणा कोणाशी बोलणे झाले याबद्दल पोलिसांना योग्य ती माहिती मिळेल.
 

Web Title: MYSTERY: Om Puri's mobile disappeared after five days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.