अपघातात मायलेकींचा मृत्यू

By Admin | Updated: March 23, 2017 03:00 IST2017-03-23T03:00:16+5:302017-03-23T03:00:16+5:30

लाटवण येथून साखरपुड्याचा कार्यक्रम संपवून पुण्याला जाणाऱ्या पिकअप जीपच्या अपघातात दोघी मायलेकी जागीच ठार झाल्या.

Myelike's death in an accident | अपघातात मायलेकींचा मृत्यू

अपघातात मायलेकींचा मृत्यू

महाड : लाटवण येथून साखरपुड्याचा कार्यक्रम संपवून पुण्याला जाणाऱ्या पिकअप जीपच्या अपघातात दोघी मायलेकी जागीच ठार झाल्या. तर अन्य नऊ प्रवासी गंभीर जखमी झाले. जीप भरधाव वेगात असल्याने चालकाचा ताबा सुटून ती रस्त्याच्या कडेला उलटली. महाडजवळ शिरवली फाट्याजवळ बुधवारी पहाटे ४ च्या सुमारास हा अपघात घडला. अपघातग्रस्त सर्व प्रवासी हे काळेवाडी, पुणे येथील रहिवासी आहेत.
दीपाली घाणेकर (३०) व दीक्षा घाणेकर (१२) या दोघी मायलेकींचा या अपघातात मृत्यू झाला, तर आवेश भोसले (१९), श्रीकांत सकपाळ (२४), कविता सकपाळ (२१), अनिल सकपाळ (२५), नितीन आवचार (२२), सोमनाथ जाधव (४२), सुशांत सकपाळ (१९), दीपक घाणेकर (३६), शर्वरी घाणेकर (८) हे प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (वार्ताहर)

Web Title: Myelike's death in an accident