शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 18:38 IST

फर्टिलिटी सेंटरने मुलाचे स्पर्म देण्यास नकार दिल्यानंतर, मृत तरुणाच्या आईने थेट न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे...

एका मृत तरुणाचे फ्रीज करून ठेवलेले वीर्य (स्पर्म) तोवर सुरक्षित करून ठेवावे, जोवर त्याच्या आईने केलेल्या याचिकेवर निकाल येत नाही, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने एक एक फर्टिलिटी सेंटरला दिला आहे. खरे तर, याचिकाकर्ता महिलेच्या मुलाचा कन्सरमुळे मृत्यू झाला आहे. कॅन्सरचा सामना करताना संबंधित तरुणाने आपले वीर्य (स्पर्म) फ्रीज करून ठेवले होते. मात्र, संबंधित तरुणाच्या मृत्यूनंतर, फर्टिलिटी सेंटरने त्याच्या आईला ते स्पर्म देण्यास नकार दिला आहे.

"सुनावणीपूर्वी हे वीर्य खराब झाले, तर..." -फर्टिलिटी सेंटरने मुलाचे स्पर्म देण्यास नकार दिल्यानंतर, मृत तरुणाच्या आईने थेट न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. दरम्यान, सुनावणीपूर्वी हे वीर्य खराब झाले, तर याचिकेचा उद्देश व्यर्थ ठरेल. यामुळे हे वीर्य सुरक्षित ठेवण्यात यावे, असे न्यायमूर्ती मनीष पितळे यांनी म्हटले आहे.

फ्रीज करून ठेवलेले स्पर्म सॅम्पल का देत नाहीये फर्टिलिटी सेंटर? -संबंधित महिलेने याचिकेत म्हटले आहे, "आपल्या मुलाला कॅन्सरचे निदान झाल्यनंतर, ऑन्कोलॉजिस्टने त्याला त्याचे वीर्य फ्रीज करण्याचा सल्ला दिला होता. कारण केमोथेरेपीने नपुंसकतेची शक्यता होती. मात्र, मुलाने कुटुंबीयांसोबत कसल्याही प्रकारची चर्चा न करता, एका फॉर्ममध्ये, आपल्या मृत्यू पश्चात वीर्य नष्ट करण्यात यावे, असा पर्याय निवडला होता. यानंतर, १६ फेब्रुवारी रोजी कुठल्याही प्रकारचे मृत्यूपत्र मागे न ठेवता त्याचा मृत्यू झाला."

टॅग्स :Mumbai High Courtमुंबई हायकोर्टcancerकर्करोगDeathमृत्यूCourtन्यायालय