शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भाजपात आलो ही माझी अडचण, कारण..; देवेंद्र फडणवीसांसमोरच नारायण राणे असं का म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 18:58 IST

शिवसेना बाळासाहेबांनंतर टक्केवारी सेना झाली. मुंबई महापालिका २५ वर्ष लुटली असा आरोप नारायण राणेंनी केला.

रत्नागिरी - माझी राजकीय वाटचाल शिवसेनेतून सुरू झाली. त्यानंतर काँग्रेस आणि आता भाजपा. हा शेवटचा पक्ष आहे. आत्ता नंतर कुठला पक्ष नाही. मी ज्या पक्षात असतो तिथे १०० टक्के असतो. कुणी कितीही ऑफर दिली तरी दगाफटका होणार नाही. ऑफर देणाऱ्याला दगा होईल किंवा फटका होईल पण माझ्याकडून होणार नाही असं विधान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले आहे. 

नारायण राणे म्हणाले की, चांगल्याला चांगले म्हणणं ही माणुसकी आहे. रवींद्र चव्हाण प्रामाणिकपणे काम करतायेत. फक्त १ सांगेन, लोकप्रतिनिधींची गर्दी ही ६ महिन्यांची नाही तर ३३ वर्षाची आहे. मी जे काही दिले त्याच वेळी दिले. मला पण फटाके काढता येतात. मी काढेन तेव्हा पळताभुई थोडी होईल. या जिल्ह्यातही राहता येणार नाही. मी सहन करतोय. कारण भाजपात मी आलोय ही माझी अडचण आहे. भाजपात असल्यानं सहनशीलता बाळगावी लागते. विचारसरणीचे लोक आहेत. आपण त्यातच बसतो मग तसे व्हायला पाहिजे असं त्यांनी म्हटलं. 

त्याचसोबत काहींना रात्री दिसत नाही दिवसा दिसते. पत्रकार त्यांना बाईट देऊन प्रश्न विचारतात. नाणारच्या गावात किती जागा घेऊन ठेवल्या. कुठल्या प्रकल्पाठिकाणी आमची जागा आहे. शिवसेना बाळासाहेबांनंतर टक्केवारी सेना झाली. मुंबई महापालिका २५ वर्ष लुटली. देश-परदेशात गुंतवणूक केली. कोकणी माणसाने शिवसेनेची सत्ता मुंबईत आणली. परंतु कोकणाकडे आणि कोकणी माणसाकडे शिवसेनेने दुर्लक्ष केले असा आरोप केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी केला. 

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?अंगणेवाडीतील सभेत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत याठिकाणाहून भाजपाचा खासदार, आमदार असेल. कोकणातील चिपी विमानतळाचे श्रेय नारायण राणेंना द्यावे लागेल. कोकणासाठी उद्धव ठाकरेंनी काही केले नाही. नारायण राणेंनी काय केले हे सर्वांना माहिती आहे. याठिकाणी रस्ते, वाहतुकीची व्यवस्था, मुलभूत सुविधा हे नारायण राणेंनी आणले असं सांगत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.  

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाShiv Senaशिवसेना