कंटेनरखाली चिरडून माय-लेक ठार

By Admin | Updated: July 12, 2016 16:40 IST2016-07-12T16:40:36+5:302016-07-12T16:40:36+5:30

कंटेनरच्या पुढच्या चाकाखाली सापडून मायलेक ठार झाल्याची घटना मंगळवारी दुपारी नगर-मनमाड महामार्गावर कोल्हारजवळील प्रवरा नदी पुलावर घडली.

My friend killed by the container | कंटेनरखाली चिरडून माय-लेक ठार

कंटेनरखाली चिरडून माय-लेक ठार

ऑनलाइन लोकमत

अहमदनगर, दि. 12 - कंटेनरच्या पुढच्या चाकाखाली सापडून मायलेक ठार झाल्याची घटना मंगळवारी दुपारी नगर-मनमाड महामार्गावर कोल्हारजवळील प्रवरा नदी पुलावर घडली.
मंगल भाऊसाहेब जपे (वय ६६), तर तिचा मुलगा विजय भाऊसाहेब जपे (वय ३५, रा. निमगाव घाणा, ता. नगर) अशी मृतांची नावे आहेत. जपे मायलेक मंगळवारी दुपारी एका कार्यक्रमाहून परतत असताना त्यांच्या मोटारसायकलला हा अपघात झाला. कोल्हार (ता. राहाता) जवळील प्रवरा नदी पूल ओलांडून जपे मायलेक पुढे नगरच्या दिशेने निघाले असता पाठिमागून येत असलेल्या कंटेनरने (एमएल ०१ एस ९११७) त्यांच्या मोटारसायकलला (एमएच १६ ७५६७) धडक दिली. त्यामुळे हे दोघेही मोटारसायकलसह कंटेनरच्या चाकाखाली चिरडले गेले. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. राहुरी पोलिसांनी कंटेनरचालकास ताब्यात घेतले आहे.
 

Web Title: My friend killed by the container

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.