‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’, आतापर्यंत जनजागृती ७६ लाखांची 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 05:16 AM2021-02-16T05:16:39+5:302021-02-16T05:17:01+5:30

CoronaVirus News : जूनमध्ये लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर मुंबईत पुन्हा कोरोना रुग्ण संख्येत वाढ दिसून येऊ लागली. ऑगस्ट महिन्यापर्यंत बाधितांच्या संख्येत चढउतार कायम होता.

‘My family, my responsibility’, public awareness of Rs 76 lakh so far | ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’, आतापर्यंत जनजागृती ७६ लाखांची 

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’, आतापर्यंत जनजागृती ७६ लाखांची 

Next

मुंबई : कोविड काळात १५ सप्टेंबरपासून राज्यासह मुंबईत ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेंतर्गत मुंबईत जनजागृती करण्यात आली. या अभियानाकरिता प्रसारभारतीसह इतर खासगी रेडिओ वाहिन्यांवरून जिंगल्स स्वरूपात संदेश देण्यात आला होता. या मोहिमेसाठी ७६ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.
जूनमध्ये लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर मुंबईत पुन्हा कोरोना रुग्ण संख्येत वाढ दिसून येऊ लागली. ऑगस्ट महिन्यापर्यंत बाधितांच्या संख्येत चढउतार कायम होता. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम राबविण्यात आली. या अंतर्गत मुंबईत आरोग्य विभाग व स्वयंसेवकांचे पथक घरोघरी जाऊन लोकांची तपासणी व जनजागृती करीत होते. कोरोनावर संपूर्ण नियंत्रण येईपर्यंत मुंबईकरांना जीवनशैलीमध्ये काही बदल करणे आवश्यक होते. यासाठी मास्कचा उपयोग, सुरक्षित अंतर, निर्जंतुकीकरणाचा वापर, वैयक्तिक, कौटुंबिक तसेच सार्वजनिक आयुष्यात नवीन बदलांचा स्वीकार करण्यास सामान्य जनमानसात व्यापक स्वरूपात जनजागृती होणे आवश्यक होते. यासाठी ही मोहीम १५ सप्टेंबरपासून राबवण्यात आली.

आरोग्यविषयक शिक्षण देणे हे मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट
 कोविड नियंत्रणासाठी अधिक प्रभावी आरोग्यविषयक शिक्षण देणे हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट होते. खासगी रेडिओ वृत्तवाहिन्यांद्वारे जिंगल्स संदेश २५ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर या १५ दिवसांच्या कालावधीत प्रसारित करण्यासाठी एकूण ३३ लाख ५१ हजार रुपये एवढे खर्च करण्यात आले, तर १५ ते २४ ऑक्टोबर या दहा दिवसांच्या कालावधीत याच खासगी रेडिओ वृत्तवाहिन्यांद्वारे ४३ लाख ३३ हजार रुपये याप्रमाणे ७६ लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.

Web Title: ‘My family, my responsibility’, public awareness of Rs 76 lakh so far

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.