शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

‘माझे कुटुंब माझी जबाबदारी, सगळे टेंडर सोयऱ्यांच्या घरी’; शिंदेंचा विधानसभेत ठाकरेंवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2023 06:34 IST

धारावीतील मोर्चावरून ‘चाहिए खर्चा, निकालो मोर्चा’ अशी वृत्ती काहींची आहे, अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली.

- दीपक भातुसेलोकमत न्यूज नेटवर्कEknath shinde Vs Uddhav Thackeray ( Marathi News ) नागपूर : मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या कथा अरेबियन नाईट्समधील कथांपेक्षा भारी आहेत. ‘कफन चोर, खिचडी चोर’ अशी बिरुदे कमी पडतील एवढा मोठा भ्रष्टाचार कोविड काळात झाला. मुंबई महापालिकेत आदित्य राजाच्या कृपेने वरुण राजाने टेंडरचा पाऊस पाडला. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी, सगळे टेंडर सोयऱ्यांच्या घरी, बाकी जनतेने फिरावे दारोदार’, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे व आदित्य यांच्यावर बुधवारी विधानसभेत हल्लाबोल केला. धारावीतील मोर्चावरून ‘चाहिए खर्चा, निकालो मोर्चा’ अशी वृत्ती काहींची आहे, अशी टीकाही मुख्यमंत्र्यांनी केली.

अधिवेशनाचा शेवटचा दिवस मुख्यमंत्र्यांच्या या भाषणानेच गाजला. कोविड काळातील भ्रष्टाचार म्हणजे मयताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

उपसमितीच्या अध्यक्षपदावरून ठाकरेंनी डावललेमविआ सरकारच्या काळात मी मराठा उपसमितीचा अध्यक्ष होऊ नये, म्हणून पडद्याआड प्रयत्न झाले. मी अध्यक्ष झालो तर मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी काम करेन, ही भीती त्यावेळच्या अडीच वर्षाच्या मुख्यमंत्र्यांना व अशोक चव्हाणांना होती. मी तेव्हा अध्यक्ष असतो तर आजची परिस्थिती निर्माण झाली नसती हे मी छातीठोकपणे सांगतो, असेही शिंदे म्हणाले.

रस्ते उभारणाऱ्या यूपीतील कंपनीला कोविडची कामे

nउत्तर प्रदेशातील हायवे कन्स्ट्रक्शन नावाची कंपनी तळपली. रस्ते बांधणीचे मुख्य काम सोडून ‘पॉवर ऑफ ॲटर्नी’ देऊन या कंपनीने मुंबई महापालिकेत २७० कोटींची ५७ कंत्राटे घेतली. यात रोमिन छेडा ही महत्त्वाची व्यक्ती आहे. nया कंपनीला जिजामाता उद्यानातील पेंग्विन पार्कचे कंत्राट दिले. ऑक्सिजन प्लान्ट उभारण्याचे काम दिले आणि तिथून याची सुरुवात झाली. nया छेडाचे बोरीवलीत परिहार स्टोअर्स नावाचे कपड्याचे दुकान होते. या कंत्राटात हायवे कंपनीला २ टक्के पैसे देऊन सर्व पैसे छेडा यांच्या खात्यात गेले. जुलैमध्ये ऑक्सिजन प्लान्टचे काम पूर्ण करायचे असताना ते ऑक्टोबरमध्ये पूर्ण केले. पण हे काम एक महिना आधीच म्हणजे ऑगस्टमध्ये पूर्ण झाल्याचे दाखवले. nऑक्टोबर धरला तर कामाच्या विलंबासाठी कंपनीला तीन महिन्यांकरिता ९ कोटी रुपये दंड आकारायला हवा होता, पण प्रत्यक्ष तीन कोटीचा दंड आकारण्यात आला. nऑगस्टमध्ये बोगस कागदपत्रांच्या आधारे काम पूर्ण झाल्याचे दाखवले, याच दाखल्याच्या आधारावर पुढचे ८० कोटीचे काम त्याला देण्यात आले, असे मुख्यमंत्री म्हणाले. 

सगळे तपासात पुराव्यासह बाहेर येणार रस्ते बांधणाऱ्या कंपनीला रोबोटिक झू, फाय डी थिएटर, प्रशासकीय कार्यालय, प्राणी, पक्षी पिंजरे, पेंग्विन कक्षाची निगा व देखरेख अशी कामेही देण्यात आली. या कंपनीला नंतर महापालिका शाळांमध्ये वॉटर प्युरिफायर पुरवण्याचे काम, पालिकेचे जुहू येथील रुग्णालय आणि जोगेश्वरी येथील बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालयाच्या हाऊस किपिंगचे तसेच पालिकेच्या विविध रुग्णालयात एसी युनिटच्या देखभालीचे कामही दिले, असा गौप्यस्फोट करत हे सगळे तपासात पुराव्यासह बाहेर येणार, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना