शहरं
Join us  
Trending Stories
1
"अफगाणिस्तानकडून राष्ट्रप्रेमाचे धडे घ्या": पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास नकार, चतुर्वेदींचा BCCI-सरकारला टोला
2
सणासुदीच्या दिवसांत दोन अपघात; नंदुरबारमध्ये सात भाविकांचा बळी, समृद्धीवर म्यानमारच्या नागरिकांचा अपघाती अंत
3
Radhika Yadav : "आत्मसन्मानाला ठेच, मी माझ्या मुलीची हत्या केली..."; टेनिसपटू राधिका यादवच्या वडिलांची कबुली
4
‘महायुती सरकारमध्ये छगन भुजबळ मंत्री ,२ सप्टेंबरचा जीआर रद्द करण्याची जबाबदारी त्यांची’, विजय वडेट्टीवार यांनी सुनावले
5
हॉटेलचा बेड पाहूनच ग्राहकाची झोप उडाली! असं काय पाहिलं की, मालकाला १ लाखांचा दंड द्यावा लागला? 
6
डॉक्टर जावयाने स्किन स्पेशलिस्ट लेकीला संपवलं; वडिलांचा मोठा निर्णय, ३ कोटीचं घर केलं दान
7
३ महिन्यांमध्ये १००० कोटी रुपयांचा फायदा; चांदीच्या किमतीनं 'यांना' केलं मालामाल
8
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी ग्रीटिंग्स, Images, Facebook, Whatsapp Status च्या माध्यमातून देऊन आनंदात साजरा करा दीपावलीचा सण!
9
Video - अग्निकल्लोळ! गरीब रथ एक्स्प्रेसला भीषण आग; डबा जळून खाक, प्रवाशांना वाचवण्यात यश
10
परळच्या फ्लॅटमध्ये व्यापाऱ्याला केलं 'टॉर्चर'; जुन्या वादातून अपहरण करुन ७६ लाखांची वसूली, महिलेचाही सहभाग
11
जामिनावर बाहेर आलेल्या आरोपीने केला महिलेवर ॲसिड हल्ला, तीन महिन्यांपूर्वी दाखल केला होता गुन्हा
12
Diwali 2025: या दिवाळीत स्वतःला द्या एक छोटासा ब्रेक; तुमचे टॅरो कार्ड काय सांगते पहा!
13
भयंकर घटना! घरात झोपलेल्या तरुणाचा अज्ञात व्यक्तीने कापला प्रायव्हेट पार्ट; कुटुंब आणि गावकरी हादरले
14
अरे देवा! भांडी घासताना काचेच्या ग्लासमध्ये अडकला हात, सर्जरीनंतरच झाली सुटका
15
मनसेला सोबत घेण्याचा प्रस्ताव दिलेलाच नाही! राऊतांचा काँग्रेसवर निशाणा, म्हणाले, "अजून ते स्वातंत्र्य चळवळीच्या काळातच"
16
अतिवृष्टीने खरीप गेला; रब्बीचा हंगाम देणार हात; धरणे, विहिरी तुडुंब भरल्याने यंदा पेरा ६५ लाख हेक्टरवर जाणार 
17
धनत्रयोदशीला सोनं खरेदी करणं फायदेशीर ठरेल का, तेजी कायम राहिल? तज्ज्ञांचं म्हणणं काय?
18
७.५ कोटी कॅश, २.५ किलो सोनं, मर्सिडीज... 'भ्रष्ट' IPS अधिकाऱ्याकडे सापडलं कोट्यवधींचं घबाड
19
काहीतरी मोठं घडणारे... सोन्याच्या किमतीतील तेजीमुळे ही कसली भीती? दिग्गज अर्थतज्ज्ञानं दिला इशारा
20
काय सत्य अन् काय स्वप्न! गूढ वाढवणारा 'असंभव' सिनेमाचा टीझर पाहिलात का?

माझ्या कुटुंबाला बदनाम केलं जातंय, त्या मंत्र्यांनी तपास करावा; मलिक यांच्या आरोपानंतर Sameer Wankhede यांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2021 08:44 IST

NCB chief sameer wankhede on Nawab malik's Allegations : Sameer Wankhede यांनी आपल्यावर करण्यात आलेल्या आरोपांचं खंडन केलं. तसंच आपण दुबईला गेलो नसल्याचंही सांगितलं. 

ठळक मुद्देआपण दुबईला गेलो नसल्याचं वानखेडे यांचं स्पष्टीकरण

NCB chief sameer wankhede on Nawab malik's Allegations  : आर्यन खानला (Aryan Khan) ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एनसीबीचे (NCB) अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना टार्गेट केलंय. त्यामुळे, याप्रकरणावरुन गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकारण चांगलेच तापलेले दिसत आहे. मलिक यांनी एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर केलेल्या टीकेमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी बॉलिवूडच्या (Bollywood) काही लोकांकडून वसूली सारख्या आरोपांवर NCB चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आपल्यावर करण्यात आलेल्या आरोपांचं खंडन केलं आहे. कोणी आपल्या कुटुंबीयांसोबत मुलांसोबत वसूली करण्यास जाईल का? असा सवालही त्यांनी केला आहे.  

"माझ्यावर करण्यात आलेला आरोप हा अतिशय चुकीचा आहे. मी दुबईला गेलो नव्हतो. मालदीवला गेलो होतो. आपल्या कुटुंबीयांसोबत मुलांसोबत कोणी वसूली करण्यास जाईल का?," असा सवाल वानखेडे यांनी केला. एनडीटीव्हीशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं. "नवाब मलिक हे मंत्री आहेत, त्यांच्याकडे सिस्टम आहे ते तपास करू शकतात. माझ्या दिवंगत आईला बदनाम केलं जात आहे, माझ्या कुटुंबीयांना बदनाम केलं जात आहे," असं त्यांनी यावेळी सांगितलं.

मलिक यांना शुभेच्छा"मंत्री मलिक यांना माझ्या शुभेच्छा आहेत, मी छोटासा सरकारी नोकर आहे, ते मोठे मंत्री आहेत. जर देशाची सेवा करण्यासाठी, प्रामाणिकपणे काम करण्यासाठी, ड्रग्जविरोधी काम करण्यासाठी ते मला तुरुंगात टाकणार असतील, तर मी त्याचे स्वागत करतो," असंही समीर वानखेडे यांनी म्हटलं आहे. वानखेडे यांनी मलिकांचे सर्व आरोप फेटाळत त्यांना चॅलेंज दिलंय. तसेच, गेल्या १५ दिवसांपासून माझ्या दिवंगत आईबद्दल, सेवानिवृत्त वडिलांबद्दल, माझ्या बहिणीबद्दल त्यांनी अतिशय गलिच्छ भाषा वापरली, ते वैयक्तीक टीका करत आहेत. त्यामुळे, मी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सल्ला-मसलत करुन कायदेशीर कारवाई करणार असल्याचं वानखेडे यांनी म्हटलंय.

काय म्हणाले होते मलिक?पुणे जिल्ह्यातील मावळमध्ये सभेत बोलताना मलिक यांनी समीर वानखेडेंचा एकेरी उल्लेख करत टीका केली. सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर समीर वानखेडे यांची एनसीबीमध्ये बदली करण्यात आली आणि लगेच रिया चक्रवर्ती हिला अटक करण्यात आली. ४-४ हजार रुपयांच्या पेमेंटच्या आधारावर गुन्हा दाखल करण्यात आला. व्हॉटस्ॲप चॅटच्या माध्यमातून अभिनेत्री व अभिनेत्यांना एनसीबीच्या दारात उभे करण्यात आले व दहशत निर्माण करण्याचे काम झाले असे सांगतानाच ही सर्व वसूली मालदीव व दुबईमध्ये झालीय असा थेट आरोप नवाब मलिक यांनी केला होता.

टॅग्स :Sameer Wankhedeसमीर वानखेडेnawab malikनवाब मलिकMaharashtraमहाराष्ट्र