जादू टोण्याच्या संशयातून मुलानं केली आईची हत्या
By Admin | Updated: May 27, 2017 14:53 IST2017-05-27T14:46:07+5:302017-05-27T14:53:33+5:30
आपली आई करणी करते या अंधश्रद्धेतून मुलानंच स्वतःच्या आईची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. नाशिकमधील ही धक्कादायक घटना आहे.

जादू टोण्याच्या संशयातून मुलानं केली आईची हत्या
ऑनलाइन लोकमत
सुरगाणा(नाशिक), दि. 27 - आपली आई करणी करते या अंधश्रद्धेतून मुलानंच स्वतःच्या आईची हत्या केल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी मध्यरात्री साबरदरा येथे ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
सोमीबाई विठ्ठल महाले असे हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. सोमीबाई यांचे पती विठ्ठल यांनी पोलिसांकडे मुलगा प्रकाशविरोधात पत्नीच्या हत्या केल्याची फिर्याद दिली.
विठ्ठल महाले यांनी फिर्यादित म्हटले आहे की, मोठा मुलगा नंदू व त्याची पत्नी हे त्यांचे घरासमोरील घरात स्वतंत्र राहत आहेत. तर विठ्ठल पत्नी सोमीबाई तसेच दुसरा मुलगा प्रकाश व त्याची पत्नी असे एकत्र राहत होते.
दरम्यान नंदू हा कायम आजारी राहत असल्याने त्याचेवर नाशिक येथे उपचार सुरू आहेत. नंदूला बाहेरची बाधा झाली असेल यासाठी प्रकाश भगताकडेही गेला होती. याच रागातून प्रकाश याने आई सोमीबाई हिची हत्या झाल्याचे आढळून आले. यावेळी प्रकाशने आई जादूटोणा करते म्हणून तिची हत्या केली असे सांगितले.
आरोपी मुलगा प्रकाशला पोलिसांनी ताब्यात घेतले असून हत्येचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.