एमयूटीपी-३चा मार्ग मोकळा!
By Admin | Updated: February 27, 2015 02:20 IST2015-02-27T02:20:47+5:302015-02-27T02:20:47+5:30
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात एमयूटीपी-३ प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. तर एमयूटीपी-१ मधील रखडलेल्या प्रकल्पांसाठी निधी मंजूर केला आहे

एमयूटीपी-३चा मार्ग मोकळा!
मुंबई : रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी यंदाच्या अर्थसंकल्पात एमयूटीपी-३ प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. तर एमयूटीपी-१ मधील रखडलेल्या प्रकल्पांसाठी निधी मंजूर केला आहे. यामुळे येत्या काही वर्षांत उपनगरीय रेल्वे प्रवाशांसाठी नवीन मार्ग आणि नवीन सुविधांचा मार्ग मोकळा झाला आहे. या अर्थसंकल्पात दिघी-रेवस पोस्टल कनेक्टिव्हिटीहीला मंजुरी मिळाली आहे.
एमआरव्हीसीकडून (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) एमयूटीपीअंतर्गत अनेक रेल्वे प्रकल्प राबविले जातात. एमयूटीपी-१ प्रकल्प एमआरव्हीसीकडून पूर्ण करण्यात आला असून एमयूटीपी-२ मधील प्रकल्प अद्याप सुरू आहेत. यामध्ये सीएसटी ते कुर्ला पाचवा-सहावा मार्ग, ठाणे ते दिवा पाचवा-सहावा मार्ग, हार्बरचा गोरेगावपर्यंत विस्तार यासह काही तांत्रिक कामांचा समावेश आहे. २००८-०९ मध्ये एमयूटीपी-२ प्रकल्पाला मंजुरी मिळाली. मात्र प्रत्यक्षात त्याच्या कामाला २०१० पासून सुरुवात करण्यात आली. मागील पाच वर्षांत हे प्रकल्प पूर्ण होणे गरजेचे होते. अद्यापही ते पूर्ण न झाल्याने खर्च चांगलाच वाढला आहे. आता यातील काही प्रकल्पांसाठी १ हजार २४ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आले आहे.