शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

mutha canal: कालवा फुटीप्रकरणी चौकशी समिती नेमावी, उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2018 19:38 IST

या घटनेविषयी आक्षेप नोंदवताना महापालिका आणि पाटबंधारे विभागाच्या कारभाराच्या चौकशीसाठी समिती नेमावी अशी मागणीही करण्यात आली आहे. 

पुणे : पुण्यात कालवा फुटून झालेल्या नुकसान भरपाईबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.या घटनेविषयी आक्षेप नोंदवताना महापालिका आणि पाटबंधारे विभागाच्या कारभाराच्या चौकशीसाठी समिती नेमावी अशी मागणीही करण्यात आली आहे. 

        गुरुवार (दि.२७ सप्टेंबर) रोजी शहरातील सिंहगड रस्त्यावर दांडेकर पुलाजवळ मुठा कालवा फुटला. या कालव्यातून झालेल्या विसर्गामुळे सुमारे ६०० घरांचे नुकसान झाले. याच विषयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते  गदादे पाटील आणि नगरसेविका प्रिया गदादे पाटील यांनीही जनहित याचिका दाखल केली आहे. याच विषयाशी निगडित याचिका ऍडव्होकेट असीम सरोदे, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, आणि सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ अशा तिघांनी मिळून दाखल केली आहे. यात पुणे महानगरपालिकेला मुख्य प्रतिवादी करण्यात आले आहे. 

        याबाबत माहिती देताना सरोदे म्हणाले की, कालव्यासाठी पाईपलाईन टाकण्याचे काम 'कावा' नावाच्या कंपनीला देण्यात आले होते. ही लाईन टाकताना कोटीही काळजी न घेता उत्खनन केले आहे. त्यांनी यासाठी कोणतीही देखरेख केली नाही. या विषयावर अत्यंत कमी आर्थिक तरतुदी आहेत. अनेक वर्षांपासून स्थानिकांनी सांगूनही कोणतीही हालचाल करण्यात आली नाही. आता हे संपूर्ण पुनर्वसन करण्यासाठी सुमारे ४० ते ५० कोटी रुपये खर्च येणार आहे याबाबत काय करण्यात येणार आहे या विषयाचा उल्लेखही संबंधित याचिकेत करण्यात आला आहे. याशिवाय पूरग्रस्त परिवारांना ५ लाख प्रत्येकी मिळावेत अशी मागणीही करण्यात आली आहे. या विषयावर तांत्रिक  निपुण समिती नेमून त्यांनी उच्च न्यायालयात अहवाल सादर करावा. तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागानेही केलेल्या उपाय योजनांची माहिती उच्च न्यायालयात द्यावी. या कालव्यात बेफिकीरपणे  केबल टाकणाऱ्या कंपन्यांकडून पाच कोटी रुपये निधी वसूल करण्यात यावा अशी मागणीही करण्यात आली आहे. या सर्व मुद्द्यांवर येत्या ५ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.

टॅग्स :Puneपुणेmula muthaमुळा मुठाfloodपूरHigh Courtउच्च न्यायालय