मुस्लिमांना कळले इसिसचे खरे स्वरूप

By Admin | Updated: February 7, 2016 01:22 IST2016-02-07T01:22:11+5:302016-02-07T01:22:11+5:30

तरुणांची डोकी भडकवून त्यांना वाममार्गाला लावणारे इसिसचे दहशतवादी नंतर त्यांची फसवणूक करीत असल्याचे मुस्लिम बांधवांच्या लक्षात आले असून, त्यांनाही इसिस ही संघटना

Muslims know the true nature of Isis | मुस्लिमांना कळले इसिसचे खरे स्वरूप

मुस्लिमांना कळले इसिसचे खरे स्वरूप

नागपूर : तरुणांची डोकी भडकवून त्यांना वाममार्गाला लावणारे इसिसचे दहशतवादी नंतर त्यांची फसवणूक करीत असल्याचे मुस्लिम बांधवांच्या लक्षात आले असून, त्यांनाही इसिस ही संघटना नको आहे. त्यामुळे आता मुस्लिमबहुल वस्त्यांमधील स्थानिक नेते पुढे येऊन तरुणांचे समुपदेशन करीत आहेत. ही अतिशय आनंदाची बाब आहे, असे मत पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी मांडले.
महाराष्ट्रासह देशातील काही मुस्लिम तरूण इसिस या दहशतवादी संघटनेकडे वळत असल्याची गंभीर दखल घेत, हे लोण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात पसरू नये, यासाठी पोलिसांनी राज्यभर मोहीम सुरू केली आहे. मुंबई आणि औरंगाबाद येथून काही मुस्लिम तरूणांना इसिसचे समर्थक असल्यामुळे अटक झाल्याची दखल घेत मुस्लिम धर्मगुरू, मौलवी तसेच त्या समाजातील विचारवंत यांच्या मदतीने मुस्लिम तरूणांच्या समुपदेशनाचे अभियान सुरू झाले आहे. त्यामुळे मुस्लिम तरूण इसिसकडे वळण्याची शक्यता कमी झाली आहे. पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांचे प्रतिपादन त्याला पुष्टी देणारेच आहे.
मुस्लिम तरूणांच्या मनात काय सुरू आहे, हे समजून घेण्याचा प्रयत्न गुप्तचरांमार्फत सुरू असून, संशय आल्यास अशा तरुणांच्या हालचालींवर लगेचच बारीक लक्ष ठेवले जात आहे. (प्रतिनिधी)

अनेकांनी घेतला धसका
केवळ पोलीसच नव्हे, तर एनआयए, आयबी अशा सर्व गुप्तचर व तपास यंत्रणा कामाला लागल्या आहेत, तर दुसरीकडे इसिसमध्ये गेल्याने काहीच साध्य होणार नाही, हे मुस्लिम तरूणांच्या लक्षात आले आहे. शिवाय भारतीय मुस्लिम तरूणांनाही इसिसने ठार केल्याने त्या संघटनेविषयी धसकाच बसला आहे. इसिसचा दहशतवाद हा जिहाद असू शकत नाही, हे बिंबवण्यात पोलिसांपासून मुस्लिमांमधील ज्येष्ठ नेते, मौलवी आणि विचारवंत यांना यश येत आहे.
- प्रवीण दीक्षित

आतापर्यंत २३ अटकेत
आतापर्यंत मुंबईच्या मालाड
तसेच माझगाव भागात राहणाऱ्या तिघा इसिस समर्थकांना अटक करण्यात आली असली तरी देशभरात अटक झालेल्यांची संख्या २३ वर गेली आहे.
इसिसविषयी कुतुहल असणाऱ्या मुस्लिम तरूणांची संख्या याहून
मोठी असण्याची शक्यता असली
तरी ते प्रत्यक्षात त्याकडे आकर्षित होताना दिसत नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
शिवाय सायबर सेलमार्फत
संशय असलेल्या प्रत्येकावर लक्ष ठेवण्यात येत असल्याने हे तरूण आता सोशल मीडियामार्फतही इसिसची माहिती मिळवण्याचा
प्रयत्न करण्याच्या फंदात
पडायला तयार नाहीत, असे या अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: Muslims know the true nature of Isis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.