शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

अल्ला देवे अल्ला दिलावे; पालखी सोहळ्यातून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2019 10:10 IST

पालखी सोहळ्यातून दरवर्षी दिला जातो सामाजिक सलोख्याचा संदेश 

- तेजस टवलारकरसंत तुकोबाराय वारी करत होते. त्यावेळी त्यांच्यासोबत शेकडो वारकरी जात होते. वाटेत एकदा असाच पाऊस आला. काय करावे कळत नव्हते. शेजारीच मशीद होती. मुस्लीम बांधवानी ती मशिद खुली करून वारकऱ्यांना आश्रय दिला. वारकऱ्यांचे पावसापासून संरक्षण केले. त्यावेळी जगदगुरू संत तुकोबारायांनी रात्री किर्तन केले. त्यात अल्ला देवे अल्ला दिलावे, असा अभंग जागेवर रचला. त्या दिवसापासून वारी सर्व समाजाची झाली. सर्वसमावेशक झाली. तुकोबांपासून घट झालेली एकोप्याची वीण वर्षानुवर्षे, युगानयुगे कायम आहे. संत तुकोबाराय पालखी सोहळा यवत मुक्कमी आला. तेथे एकोप्याची वीण अधिक घट्ट झाल्याचा अनुभव आला. पालखीत वारकऱ्यांना सर्वधर्मीय दाते मिळतात. यवतलाहू मुस्लीम समाज जेवण देतो. आज यवत मुक्कामी सोहळा आला. मात्र एकदशी होती. लोकांचे उपवास होते. यवत गावकरी झुणका भाकर असे पारंपारिक जेवण करतात. मात्र यंदा भगर केली तीही सातशे किलो. मुस्लीम समाजही जेवण करतो. मात्र एकादशी आल्याने मुस्लीम समाजाने चक्क खिचडी केली, तीही शंभर किलो. 

यवतला येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मुस्लीम समाजाकडून दर वर्षी जेवण दिले जाते. यावर्षी येथील दर्ग्यामध्ये शंभर किलो साबुदाण्याची खिचडी करण्यात आली होती. मागील अनेक वर्षांपासून धार्मिक सलोख्याची परंपरा जपली जात आहे. ती सलोख्याची वीण अधिक घट्ट होत आहे. यवतमधील मुस्लीम समाजाचे तरूण वारकऱ्यांच्या सेवेसाठी दरवर्षी तत्पर असतात.  ग्रामस्थांतर्फे वारकऱ्यांना जेवण दिले जाते. त्यात मुस्लीम समाजही मागे नसतो. येथील दर्ग्यामध्ये मुस्लीम तरूण एकत्र येत वारकऱ्यांसाठी स्वयंपाक करतात. यावर्षी पालखी मुक्कामाच्या दिवशी उपवासाचा दिवस असल्याने या तरूणांनी खिचडीचा बेत आखला होता. शंभर किलो साबुदाण्यापासून येथे खिचडी तयार करण्यात आली होती. त्यामुळे या ठिकाणी हिंदू-मुस्लीम समाजातील एकोप्याचे उत्तम उदाहरण पाहायला मिळाले. धार्मिक सलोखा वाढवणाऱ्या उपक्रमाचे समाजातून स्वागत झाले. उपक्रमामध्ये समीर सय्यद, रौफ सय्यद, लिकायत शेख, फिरोज मुलाणी, अझमुद्दीन तांबोळी यांच्यासह अनेक तरूण दरवर्षी सहभागी होत असतात. ग्रामस्थ व पालखी सोहळ्याच्या वतीनेही या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.  

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीHinduहिंदूMuslimमुस्लीम