शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मुस्लिम तरुणांनी पुकारला ‘बंधुभाव-भाईचारा’

By admin | Updated: November 30, 2015 02:03 IST

जगासमोर दहशतवादाचे भीषण संकट आहे. कोणताही धर्म दहशतवादाची शिकवण देत नाही. भारतीय हीच आपली प्रथम ओळख असून धर्म नंतर येतो.

पुणे : जगासमोर दहशतवादाचे भीषण संकट आहे. कोणताही धर्म दहशतवादाची शिकवण देत नाही. भारतीय हीच आपली प्रथम ओळख असून धर्म नंतर येतो. धार्मिक सौहार्द व बंधुभाव रुजवण्यासाठी संवादाचा सेतू उभारणे गरजेचे असल्याचे मत दहशतवादविरोधी पथकाचे सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे यांनी व्यक्त केले.‘बंधुभाव-भाईचारा’ संकल्पनेतून शेकडो मुस्लिम तरुणांनी एकत्र येऊन पॅरिस हल्ला आणि दहशतवादाचा निषेध केला. मार्केट यार्ड येथील न्यू एरा सोसायटीच्या मैदानात आयोजित या कार्यक्रमात बर्गे बोलत होते. या वेळी अ‍ॅड. अभय छाजेड, एटीएसचे वरिष्ठ निरीक्षक बापू कुतवळ, सुनील तांबे, अरविंद गोकुळे, मौलाना कारी इद्रिस, भरत कांबळे, शाहीद इनामदार, शब्बीरभाई शेख, इसाक चाबीवाले, सहायक निरीक्षक विनोद पाटील, नितीन कदम आदी उपस्थित होते. बर्गे म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वच विभागांचे प्रमुख मुस्लिम होते. त्यांच्यामध्ये कधी भेदभाव आला नाही. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात मुस्लिम समाजाचे योगदान मोठे आहे. अनेक क्रांतिकारक आणि कार्यकर्त्यांनी देशासाठी आपले रक्त सांडले असून बलिदानाची ही परंपरा आजही कायम आहे. देशाच्या सुरक्षेसाठी सीमेवर लढताना अनेक मुस्लिम सेना अधिकाऱ्यांनी बलिदान दिले आहे. त्यामुळे या देशावर मुस्लिमांचाही तेवढाच अधिकार आहे.’’‘मुस्लिम तरुणकिंडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. त्यांनाही समान संधी उपलब्ध करुन दिल्या पाहिजेत’’ असे छाजेड या वेळी म्हणाले. ‘‘जगातील कोणताही धर्म दहशतवादाची शिकवण देत नसून, इस्लाममध्ये हिंसेला आणि दहशतवादाला थारा नाही. त्यामुळे तरुणांनी अशा प्रलोभनांपासून दूर राहण्याचे आवाहन मौलाना कारी इद्रिस यांनी केले. मस्जिद आणि मदरशांमध्ये शिक्षण घेणाऱ्या चिमुकल्यांनी हातामध्ये दहशतवादाचा निषेध करणारे फलक घेऊन मैदानाभोवती पदयात्रा काढली. यासोबतच महर्षीनगर येथील मस्जिदीमधील मुलांनी ‘धार्मिक एकता आणि इस्लामची शिकवण’ या विषयावर नाटिका सादर केली. या कार्यक्रमाचे आयोजन शब्बीरभाई शेख, यासीन शेख, जकिरीया मेमन, नूर सय्यद, बाझीलभाई शेख, सोहेल इनामदार, रहिमुद्दीनभाई शेख, रवी शिंदे, संदीप शहा यांनी केले होते.