कोल्हापुरात मुस्लीम बांधवांनी पाकिस्तानचा ध्वज जाळला

By Admin | Updated: September 20, 2016 20:33 IST2016-09-20T20:33:02+5:302016-09-20T20:33:02+5:30

मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद अशा जोरदार घोषणा मंगळवारी सायंकाळी येथील दसरा चौकातील शाहू महाराजांच्या पुतळयासमोर घुमल्या.

Muslim Brothers in Kolhapur burn the flag of Pakistan | कोल्हापुरात मुस्लीम बांधवांनी पाकिस्तानचा ध्वज जाळला

कोल्हापुरात मुस्लीम बांधवांनी पाकिस्तानचा ध्वज जाळला

ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. २० : मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद अशा जोरदार घोषणा मंगळवारी सायंकाळी येथील दसरा चौकातील शाहू महाराजांच्या पुतळयासमोर घुमल्या. येथील तमाम मुस्लीम बांधवांनी उरी येथील अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याचा निषेध म्हणून पाकिस्तानचा निषेध केला व त्यांचा राष्ट्रध्वज जाळून शंखध्वनी केला. मुस्लीम बोर्डिंग संस्थेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
काश्मीरमधील उरी येथे पाकिस्तान प्रशिक्षित अतिरेक्यांनी भारतीय लष्कराच्या तळावर बॉम्बस्फोट करून हल्ला केला. त्यामध्ये अठरा भारतीय जवान शहिद झाले. या जवांनाप्रती आदराची भावना व्यक्त करून त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली व हल्ला करणाऱ्या पाकिस्तानचा निषेध करण्यात आला. पाकिस्तान मुर्दाबाद...भारत माता की जय अशा घोषणांनी चौक दणाणून गेला. या आंदोलनात कादर मलबारी, गनी आजरेकर, डॉ.वसीम मुल्ला, जाफर मलबारी,आशपाक आजरेकर,नवेझ मुल्ला,इर्शाद बंडवल,रफिक शेख,नजीर थोडगे,बंकट थोडगे, वसीम चाबुकस्वार आदी सहभागी झाले.

Web Title: Muslim Brothers in Kolhapur burn the flag of Pakistan