संगीतकार इस्माईल दरबार यांना अटक
By Admin | Updated: February 4, 2015 16:16 IST2015-02-04T16:16:14+5:302015-02-04T16:16:14+5:30
सहाय्यक दिग्दर्शकाला मारहाण केल्याप्रकरणी बॉलीवूडमधील ख्यातनाम संगीतकार इस्माईल दरबार यांना मुंबई पोलिसांनी अटक केल्याचे वृत्त आहे.

संगीतकार इस्माईल दरबार यांना अटक
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ४ - सहाय्यक दिग्दर्शकाला मारहाण केल्याप्रकरणी बॉलीवूडमधील ख्यातनाम संगीतकार इस्माईल दरबार यांना मुंबई पोलिसांनी अटक केल्याचे वृत्त आहे.
संगीतकार इस्माईल दरबार यांच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये करणारे सहाय्यक दिग्दर्शक प्रकाश चौधरी यांनी मंगळवारी रात्री पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. चौधरी हे दरबार यांच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करत होते. मंगळवारी संध्याकाळी इस्माईल दरबार यांचा मुलगा आणि अन्य तिघांनी हॉकी स्टीकने मारहाण केल्याची चौधरी यांनी तक्रार केली होती. या मारहाणीच्या वेळी इस्माईल दरबारही तिथे उपस्थित होते असे चौधरी यांनी म्हटले होते. पोलिसांनी काल इस्माईल दरबार यांच्या मुलाला आणि त्याच्या दोघा साथीदारांना अटक केली होती. आज दुपारी पोलिसांनी इस्माईल दरबार यांनाही अटक केल्याचे वृत्त आहे. दरबार आणि चौधरी यांच्यामध्ये पैशावरुन वाद होता अशी माहिती समोर येत आहे.