पुणे : सुधीर फडके अर्थात सर्व रसिकांचे आवडते गायक, संगीतदिग्दर्शक बाबूजी. बाबूजींची गाणी ऐकताना नेहमीच मनाला आनंद आणि कानांना एक सुंदर सांगीतिक मेजवानी असते. बाबूजींची हीच अजरामर गाणी पुन्हा ऐकायला मिळाली तर आणि तीही श्रीधर फडके यांच्या आवाजात..? वाचकांची व रसिक प्रेक्षकांची आवड व आग्रह लक्षात घेऊन ‘लोकमत सीएनएक्स’ने ‘बाबूजींची गाणी’ ही सांगीतिक मेजवानी पुणेकरांसाठी आणली आहे. पृथ्वी एडिफाईस आणि वूड फायर ग्रिल आणि ‘लोकमत’तर्फे आयोजित बाबूजींची गाणी या कार्यक्रमात श्रीधर फडकेंना शिल्पा पुणतांबेकर, शेफाली कुलकर्णी आदी कलाकारांची साथ लाभणार आहे. सुधीर फडके यांच्या स्मरणार्थ या सांगीतिक मेजवानीचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम रविवारी (दि. ३१) सायंकाळी ५ वाजता बालशिक्षण मंदिर, एरंडवणे, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या विनामूल्य व मोेजक्या प्रवेशिका लोकमत शहर कार्यालयात दिनांक ३१ जुलै २०१६ रोजी मिळणार आहेत. तरी सर्व वाचकांनी आपली प्रवेशिका नक्की करून या संगीत मैफिलीचा आनंद घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.(प्रतिनिधी)>कार्यक्रमाच्या विनामूल्य प्रवेशिका लोकमत शहर कार्यालय व्हीया वेन्टेज, १/२ मजला, सीटीएस ५५/२, एरंडवणे, लॉ कॉलेज रोड, पुणे ४११००४ येथे मिळतील. रविवार, दि. ३१ जुलै २०१६ रोजी ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ तत्त्वावर मोजक्या प्रवेशिका मिळतील.प्रत्येकाला २ प्रवेशिका मिळतील.प्रवेशिका सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत शिल्लक असेपर्यंत मिळतील.प्रत्येक प्रवेशिकेवर आसन क्रमांक नमूद केलेला आहे. कार्यक्रम रविवारी (दि. ३१ जुलै २०१६) सायंकाळी ५ वाजता बालशिक्षण मंदिर, एंरडवणे येथे होणार आहे.
‘बाबूजींची गाणी’ सांगीतिक पर्वणी
By admin | Updated: July 31, 2016 01:01 IST