दंडातून ‘मरे’ला १२८ कोटींचा फायदा
By Admin | Updated: April 24, 2017 03:47 IST2017-04-24T03:47:09+5:302017-04-24T03:47:09+5:30
विनातिकीट प्रवाशांना पकडण्यासाठी ‘मरे’तर्फे विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर विशेष मोहीम राबवण्यात आली. त्यामुळे गेल्या आर्थिक वर्षात

दंडातून ‘मरे’ला १२८ कोटींचा फायदा
मुंबई : विनातिकीट प्रवाशांना पकडण्यासाठी ‘मरे’तर्फे विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर विशेष मोहीम राबवण्यात आली. त्यामुळे गेल्या आर्थिक वर्षात २०१६-१७ मध्ये ‘मरे’ला १२८ कोटी ६३ लाखांचा महसूल दंडवसुलीतून मिळाला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत दंडवसुलीत यंदा ६.६८ टक्क्यांची वाढ झाली.
तिकीट, पास काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी ‘मरे’तर्फे विविध कल्पना लढवून उपक्रम राबविले जातात. गेल्या आर्थिक वर्षात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दंडवसुलीकडे विशेष लक्ष दिले होते. विनातिकीट प्रवास करणाऱ्या, तिकिटाविना लगेज नेणाऱ्या तब्बल २६ लाख ८८ हजार प्रवाशांना गेल्या आर्थिक वर्षात पकडण्यात आले, तर २०१५-१६ या आर्थिक वर्षात २४ लाख ३१ हजार प्रवाशांना पकडले होते. यात २०१६-१७ मध्ये १२८ कोटी ६३ कोटींची दंडवसुली झाली असून, २०१५-१६ मध्ये १२० कोटी ५७ लाख रुपयांची दंडवसुली करण्यात आली होती. (प्रतिनिधी)