चारित्र्याच्या संशयावरून प्रेयसीचा खून
By Admin | Updated: June 10, 2016 10:06 IST2016-06-10T10:06:16+5:302016-06-10T10:06:37+5:30
चारित्र्याच्या संशयावरून प्रेयसीचा गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना कर्वेनगर येथील वनदेवी मंदिराजवळ गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास घडली.

चारित्र्याच्या संशयावरून प्रेयसीचा खून
>आरोपी अटक : कटरने चिरला गळा
पुणे, दि.१० - चारित्र्याच्या संशयावरून प्रेयसीचा गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना कर्वेनगर येथील वनदेवी मंदिराजवळ गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास घडली. हा प्रकार साडेअकराच्या सुमारास उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात करीत आरोपीला गजाआड केले.
रुपाली मरे ऊर्फ रुपाली तोंडे (वय 35, रा. सिंहगड रोड) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. वारजे पोलिसांनी याप्रकरणी पप्पू ऊर्फ भारत महादेव दुर्गे (वय 33, रा. सुतार दरा कोथरुड) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपाली आणि आरोपी पप्पू यांच्यात प्रेमसंबंध होते. गुरुवारी रात्री हे दोघे वनदेवी मंदिराजवळ असलेल्या शिवदीप वडापाव सेंटरजवळ मित्राच्या ऑटोरिक्षा मध्ये बोलत बसलेले होते. त्यावेळी त्यांच्यामध्ये वाद झाला. पप्पूला रुपालीच्या चारित्र्यावर संशय असल्यामुळे त्याने शिवीगाळ करीत मारहाण केली. त्यांनतर स्वतः जवळील कटरने रुपालीचा गळा चिरून खून केला.
घटनास्थळावरून तो पसार झाला. दरम्यान, रिक्षा मालक आणि पप्पूचा मित्र असलेल्या सोमनाथ शन्कर ठाकर (वय 36, रा. समर्थ निवास, गणंजय सोसायटी, कोथरूड) यांच्या हि बाब लक्षात आली. पोलिसांना साधारणपणे साडेअकराच्या सुमारास माहिती मिळाली. वरिष्ठ निरीक्षक अनुजा देशमाने यांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली. आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली.