काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याची भरबाजारात धारदार शस्त्राने हत्या
By Admin | Updated: January 21, 2017 17:58 IST2017-01-21T17:58:40+5:302017-01-21T17:58:40+5:30
भरबाजारात काँग्रेसचे पदाधिकारी संदीप वराळ यांची धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली आहे. पारनेर तालुक्यातील निघोजमधील ही घटना आहे.

काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याची भरबाजारात धारदार शस्त्राने हत्या
ऑनलाइन लोकमत
अहमदनगर, दि. 21 - भरबाजारात काँग्रेसचे पदाधिकारी संदीप वराळ यांची धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली आहे. पारनेर तालुक्यातील निघोजमधील ही घटना आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली असून दहशत निर्माण झाली आहे. मृत संदीप वराळ हे निघोजचे माजी सरपंच, युवक काँग्रेस कार्यकर्ते, पारनेर बाजार समितीचे माजी उपसभापती होते. शनिवारी सकाळी 10.30 वाजण्याच्या सुमारास दिवसाढवळ्या 10 ते 12 बाईकस्वारांनी धारदार शस्त्रांनी हत्या केली.
पूर्व वैमनस्यातून हत्या झाल्याचा पोलिसांचा संशय आहे. संदीप वराळ यांच्या हत्येनंतर निघोजमध्ये तातडीने दुकाने बंद करण्यात आली. त्यानंतर पोलीस अधीक्षक सौरभ त्रिपाठी, पोलीस उपअधीक्षक आनंद भोईटे, पोलीस निरीक्षक दिलीप पारेकर यांच्यासह मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला.
संदीप वराळ परिसरात ‘गोंड्या’ नावाने परिचित होते. निघोजचा ग्रामपंचायत सदस्य प्रवीण रसाळ यांच्याशी त्यांचे वैमनस्य होते, अशी माहिती समोर आली आहे. या दोघांच्या गटात अनेकवेळा हाणामाऱ्याही झाल्या होत्या. त्यामुळे सध्यातरी रसाळ टोळीवरच प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.