पुण्यात भररस्त्यात महिलेची हत्या, हल्लेखोर महिलेची बाईक घेऊन पसार
By Admin | Updated: October 18, 2016 10:16 IST2016-10-18T09:21:34+5:302016-10-18T10:16:12+5:30
पुण्यामध्ये एका महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

पुण्यात भररस्त्यात महिलेची हत्या, हल्लेखोर महिलेची बाईक घेऊन पसार
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 18 - पुण्यात भर रस्त्यात कामावर जाणा-या एका महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली. शुभांगी खटावकर असे मृत महिलेचे नाव आहे. कोथरुड येथील राहुर नगरमध्ये सकाळी ५.३० च्या सुमारास ही घटना घडली.
शुभांगी बाईकवरुन कामावर जात असताना अज्ञाताने तिच्या डोक्यावर वार केले. डोक्यावर वर्मी घाव बसल्याने शुभांगीचा मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे शुभांगीची हत्या केल्यानंतर हल्लेखोर तिचीच बाईक घेऊन पसार झाला. आता कोथरुड पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.