जादूटोण्याच्या संशयावरून हत्या
By Admin | Updated: August 24, 2015 00:49 IST2015-08-24T00:49:59+5:302015-08-24T00:49:59+5:30
जमिनीच्या वादातून काका त्रास देत असल्याच्या संशयाने पुतण्याने रविवारी भररस्त्यावर काकाची हत्या केली. ही घटना वांगणी रेल्वे स्थानकालगत घडली.

जादूटोण्याच्या संशयावरून हत्या
बदलापूर : जमिनीच्या वादातून काका त्रास देत असल्याच्या संशयाने पुतण्याने रविवारी भररस्त्यावर काकाची हत्या केली. ही घटना वांगणी रेल्वे स्थानकालगत घडली.
सोमनाथ पारधी (५०) यांचा पुतण्या रामदास पारधीसोबत जमिनीचा वाद होता. सोमनाथ जादूटोणा करीत असल्याचा संशय रामदासला होता. रविवारी सोमनाथ हे वांगणी बाजारपेठेत खरेदीसाठी आले असता रामदासने नितीन सप्रे आणि शाहरूख शेख या साथीदारांच्या मदतीने भररस्त्यात धारदार शस्त्राने त्यांची हत्या केली. हत्येनंतर लगेचच आरोपींना पोलिसांनी अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे यांनी हा प्रकार जमिनीच्या वादातून घडल्याचे सांगितले.