हत्येपूर्वी मारेकरी कपाडियांच्यासमवेत दारु प्याले होते
By Admin | Updated: March 10, 2015 04:20 IST2015-03-10T04:20:29+5:302015-03-10T04:20:29+5:30
हत्येआधी उच्च न्यायालयाचे निवृत्त प्रधान सचिव डायरस कपाडिया (७८) यांना मारेकऱ्यांनी दारू पाजली होती. ते नशेत तर्र झाल्यानंतर मारेक-यांनी

हत्येपूर्वी मारेकरी कपाडियांच्यासमवेत दारु प्याले होते
जयेश शिरसाट, मुंबई
हत्येआधी उच्च न्यायालयाचे निवृत्त प्रधान सचिव डायरस कपाडिया (७८) यांना मारेकऱ्यांनी दारू पाजली होती. ते नशेत तर्र झाल्यानंतर मारेकऱ्यांनी त्यांचे अख्खे घर उसकले. आठ लाखांची चोरी केल्यानंतर जाता जाता त्यांची हाताच्या नसा व गळा कापून हत्या केली, अशी धक्कादायक माहिती वांद्रे पोलिसांच्या तपासातून पुढे आली आहे.
कपाडीया आणि जय नवरंग यांनी यापूर्वी दोनवेळा एकत्र बसून मद्यपान केले होते. एरव्ही अनोळखी व्यक्तीला दार न उघडणाऱ्या कपाडीयांचा तो चांगल्या परिचयाचा होता. त्याहून महत्वाचे म्हणजे त्याचे वडील हे त्यांचे विश्वासू होते. त्यामुळे हत्येच्या दिवशी रात्री नऊच्या सुमारास दरावर आलेल्या जयला कपाडीया यांनी आत घेतले. त्याच्यासोबत आलेल्या कल्पेशचेही त्यांनी स्वागत केले. जयने आपल्यासोबत व्होडकाच्या पाच क्वार्टर आणल्या होत्या. रात्री साडेदहापर्यंत तिघांनी मिळून त्या रिचवल्या.हत्येची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आठ तासामध्ये २५ संशयीतांची चौकशी करून जय तानाजी नवरंग (२१) आणि कमलेश नारायण जाधव उर्फ मिनी (२२) यांना अटक केली. यापैकी जय हा कपाडीया यांच्या घरी काही महिने घरकाम करत होता. त्याचे रिक्षाचालक वडील तानाजी हे कपाडीया दाम्पत्याचे अत्यंत विश्वासू होते. त्यांना ते मुलासारखे समजत होते. लीली यांना आपल्या पतीची हत्या झाल्याचे समजल्यानंतर पहिला फोन त्यांनी तानाजी यांना केला.तानाजीही त्यांना डॅडी, मम्मी हाक मारत.
वांद्रयाच्या पारसी कॉलनीत कपाडीया आणि पत्नी लीली(७४) हे वयोवृद्ध दाम्पत्य वास्तव्यास होते. नेहमीप्रमाणे पत्नी त्यांच्या ५० वर्षीय मुलीच्या घरी गेल्या होत्या. कपाडीया घरी एकटेच होते. त्यामुळे त्यांना मारुन चोरी करणे शक्य असल्याचे जयने कमलेशला सांगितले. त्यानुसार भेटण्याचे निमित्य करुन दोघांनी घरात प्रवेश केला होता, असे वांद्रे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रामचंद्र ढवळे व निरीक्षक राजेंद्र काणे यांनी सांगितले.