समाजसेवी जोगी दाम्पत्याची हत्या

By Admin | Updated: September 2, 2015 01:12 IST2015-09-02T01:12:40+5:302015-09-02T01:12:40+5:30

नांदा येथील समाजसेवक व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचे प्रचारक डॉ. देवराव पांडुरंग जोगी (६२) व त्यांची पत्नी सुधा (५५) यांची अज्ञात हल्लेखोरांनी

The murder of a social worker Jogi Das | समाजसेवी जोगी दाम्पत्याची हत्या

समाजसेवी जोगी दाम्पत्याची हत्या

गडचांदूर (चंद्रपूर) : नांदा येथील समाजसेवक व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांचे प्रचारक डॉ. देवराव पांडुरंग जोगी (६२) व त्यांची पत्नी सुधा (५५) यांची अज्ञात हल्लेखोरांनी सोमवारी रात्री निर्घृण हत्या केली. सोमवारी जोगी दाम्पत्य श्रावणमासानिमित्त त्यांचे शेजारी देशमुख यांच्या घरी जेवणासाठी
गेले होते.
मात्र जेवणाआधीच डॉ. जोगी यांना रात्री पावणेनऊच्या सुमारास मोबाइलवर फोन आल्यानंतर ते व त्यांच्या पत्नी घरी गेले होते. त्यानंतर त्यांची तब्बेत बरी नसल्याने ते जेवणाला आले नसतील, असे देशमुख कुटुंबीयांना वाटले. मंगळवारी सकाळी इंदिरा देशमुख जोगी यांच्या घरी गेल्या असता हत्येची घटना उघडकीस आली. उपविभागीय पोलीस अधिकारी रामचंद्र काठे यांच्या पथकाने पंचनामा केला. त्यांच्या हत्येचे कारण उलगडलेले नाही. डॉ. जोगी दाम्पत्याच्या मागे तीन विवाहित मुली, नातवंडे असा परिवार आहे.

Web Title: The murder of a social worker Jogi Das