शिवसेनेच्या मुखेड तालुकाप्रमुखाची हत्या
By Admin | Updated: September 4, 2014 02:03 IST2014-09-04T02:03:22+5:302014-09-04T02:03:22+5:30
जामखेड-बीड मार्गावर कार अडवून दरोडेखोरांनी शिवसेनेचे मुखेड तालुकाप्रमुख शंकर महादेव ठाणोकर यांची शस्त्रने हत्या केली.

शिवसेनेच्या मुखेड तालुकाप्रमुखाची हत्या
जामखेड (जि. अहमदनगर) : मुंबईहून नांदेडला परतणा:या शिवसेना पदाधिका:यांची जामखेड-बीड मार्गावर कार अडवून दरोडेखोरांनी शिवसेनेचे मुखेड तालुकाप्रमुख शंकर महादेव ठाणोकर यांची शस्त्रने हत्या केली. पदाधिका:यांकडील दागिने, रोकड घेऊन कारसह पसार झाले.
नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यातील 65 गावे मुखेड विधानसभा मतदारसंघात येत असल्याने संभाव्य उमेदवार निवडीची चर्चा करण्यासाठी शिवसेना मुखेड तालुकाप्रमुख शंकर महादेव ठाणोकर (रा. जाहूर, ता. मुखेड), तालुका उपप्रमुख रामराव जीवनराव गौंड, (रा. जांब बुद्रुक, मुखेड) मुखेड शहरप्रमुख शिवाजी शंकरराव गेडेवार, कंधार तालुकाप्रमुख भालचंद्र बापूसाहेब नाईक, नांदेड किसान सेना जिल्हा प्रमुख शंकर नारायण लुटे (रा. टोकणी, नांदेड) मुंबईला गेले होते. मुंबईहून मुखेडला परतताना बुधवारी रात्री 12.45 वाजेच्या दरम्यान जामखेड-बीड रस्त्यावरील मोहा शिवारात नंबर नसलेल्या एका पांढ:या रंगाच्या कारने त्यांची गाडी अडविली. चोरटय़ांनी रोकड व दागिने काढा, असे सांगत भालचंद्र नाईक व शंकर ठाणोकर यांना लाथाबुक्क्याने मारहाण केली. 7 ते 8 चोरटय़ांपैकी एकाने गुप्तीसारख्या धारदार हत्याराने ठाणोकर यांच्यावर हल्ला करून त्यांना जीवे मारले. शंकर लुटे, मनोज गोंड व वाहनचालक आजीनाथ बैलके यांनाही मारहाण केली. (प्रतिनिधी)