संगमनेर येथे खून करून मृतदेह जाळले !
By Admin | Updated: January 2, 2016 08:34 IST2016-01-02T08:34:47+5:302016-01-02T08:34:47+5:30
नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गालगत बोटा शिवारात जळालेल्या अवस्थेत आढळलेल्या तरुण-तरुणीची उत्तरीय तपासणी झाली असून तीक्ष्ण हत्याराने खून केल्यावर

संगमनेर येथे खून करून मृतदेह जाळले !
संगमनेर (अहमदनगर) : नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गालगत बोटा शिवारात जळालेल्या अवस्थेत आढळलेल्या तरुण-तरुणीची उत्तरीय तपासणी झाली असून तीक्ष्ण हत्याराने खून केल्यावर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने त्यांना जाळण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शुक्रवारी घारगाव पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
कच नदी परिसरातील एका पडीक शेत जमिनीवर बुधवारी अनोळखी तरुण-तरुणीचे मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आले. मृतदेहापासून काही अंतरावर पेट्रोलचा वास येत असलेल्या दोन रिकाम्या प्लॅस्टीकच्या बाटल्या, नायलॉन दोरी व चपला सापडल्या. मात्र हा घातपात की आत्महत्या, याचा उलगडा होत नव्हता.
गुरुवारी सायंकाळी दोन्ही मृतदेहांची लोणीच्या प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. या अहवालानुसार, तरुण सुमारे ३० वर्षे वयाचा असून त्याच्या डोके, छाती व बरगडीवर तीक्ष्ण हत्याराचे घाव आढळले. तर तरुणी अंदाज २४ वर्षे वयाची असून पोटात उजव्या बाजूला ३ आणि डाव्या बाजूला घाव घातल्याचे स्पष्ट झाले.