पुण्यातील अट्टल गुंड लहू ढेकणे याचा खून

By Admin | Updated: May 17, 2015 01:46 IST2015-05-17T01:46:49+5:302015-05-17T01:46:49+5:30

पॅरोलवर बाहेर पडलेला पुण्याचा अट्टल गुंड लहू रामचंद्र ढेकणे (३९) याचा कोल्हापुरातील गिरगाव परिसरात निर्घृण खून झाल्याचे शनिवारी सकाळी उघडकीस आले.

The murder of the heinous kidnap of blood in Pune | पुण्यातील अट्टल गुंड लहू ढेकणे याचा खून

पुण्यातील अट्टल गुंड लहू ढेकणे याचा खून

कोल्हापूर/कळंबा : दोन खून प्रकरणांत जन्मठेपेची शिक्षा झालेला, तसेच कळंबा मध्यवर्ती कारागृहातून सहा महिन्यांपूर्वी पॅरोलवर बाहेर पडलेला पुण्याचा अट्टल गुंड लहू रामचंद्र ढेकणे (३९) याचा कोल्हापुरातील गिरगाव परिसरात निर्घृण खून झाल्याचे शनिवारी सकाळी उघडकीस आले. मारेकऱ्यांनी त्याचे शिर व हातांचे पंजे धडावेगळे करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
गिरगाव परिसरातील गवती डोंगरावर शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास गुराख्यांना अज्ञात तरुणाचा शिर व दोन्ही हातांचे पंजे नसलेला मृतदेह दिसून आला. माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी रवाना झाले. मृतदेहाच्या पँटच्या खिशातील डायरी व मतदान ओळखपत्रामुळे ढेकणे याची ओळख पटली; परंतु मृतदेह त्याचाच आहे का, याची खात्री करण्यासाठी त्याचा भाऊ
अंकुश ढेकणे याला पोलिसांनी कोल्हापुरात बोलावून घेतले. त्याने मृतदेह ओळखल्यानंतर पोलिसांनी रात्रीच मारेकऱ्यांच्या शोधासाठी पुणे, सातारा, जयसिंगपूर, इचलकरंजी, कऱ्हाड, आदी परिसरात पथके रवाना केली. (प्रतिनिधी)

पुणे-सातारा जिल्ह्यांत खंडणीसाठी दोन मुलांचे अपहरण करून खून केल्याप्रकरणी पुण्याच्या अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने ढेकणेला फाशीची शिक्षा सुनावली. त्यानंतर त्याने शिक्षेस उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यावर न्यायालयाने फाशीची शिक्षा रद्द करून जन्मठेपेमध्ये रूपांतर केले होते. नोव्हेंबर २०१४ मध्ये तो कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहातून पॅरोलवर सुटला होता.

Web Title: The murder of the heinous kidnap of blood in Pune